*प्रागतिक विद्यालय मध्ये नेत्र तपासणी शिबिर*

*प्रागतिक विद्यालय मध्ये नेत्र तपासणी शिबिर*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- प्रागतिक विद्यालय कोराडी, कॉलनी येथे प्रभाव फाउंडेशन दिल्ली तर्फ दिनांक 20 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर ला तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या भरपुर प्रतिसाद मिळाला शिबिरांमध्ये एकूण 379 विद्यार्थी व पालकांनी नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटपाचा लाभ घेतला. शिबीराचे संचलन डाँ. धृवल पारेख व त्यांची चमू यांनी केले. शिबिराचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश कुंभलकर, कोषाध्यक्ष खुशाल ढोबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. समरीत, पर्यवेक्षक पी. बी. दुधपचारे, प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक वाघ, आर. यू. शंभरकर, एस. एम. समरीत, ए. के. ढोबळे, एस. एस. शंभरकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …