*पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त विविध योजनाच्या लाभार्थांच्या सत्कार*
*भाजपा कन्हान शहर विविध आघांड्यांची नवीन कार्यकारिणी घोषित*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा पारशिवनी तालुका कन्हान शहर द्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता विविध योजनाच्या लाभार्थांच्या सत्कार करण्यात आला असुन भाजपा कन्हान शहराची विविध कार्यकारणीच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष , महामंत्री यांची घोषणा करीत सत्कार करुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
भाजपा पारशिवनी तालुका कन्हान शहर द्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवना वर भाजपा पदाधिकार्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी भाजपा कन्हान शहर महिला घाडाडी , भाजपा कन्हान शहर अनु सुचित जाती मोर्चा , भाजपा कन्हान शहर युवा मोर्चा च्या नवनियुक्त अध्यक्ष , उपाध्यक्ष , महामंत्री व इतर पदाधिकार्यांची नियुक्त करण्यात आल्याने त्यांचा दुपट्टा घालुन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच केंद्र शासना द्वारे काढलेल्या विविध योजने च्या लाभार्थांच्या प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कार्यक्रमात भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा पारशिवनी तालुका महिला अध्यक्ष सरिता लसुंते , भाजपा नागपुर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शालीनी बर्वे , जिल्हा उपाध्यक्ष स्वाती पाठक , मंत्री पौर्णिमा दुबे , भाजपा नागपुर जिल्हा अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा मंत्री रिंकेश चवरे , युवा मोर्चा तालुका महामंत्री सौरभ पोटभरे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , महामंत्री माधव वैद्य , उपाध्यक्ष मनोज कुरडकर , उपाध्यक्ष , राजेश गणोरकर , उपाध्यक्ष आशिष सायरे , भाजपा कन्हान शहर महिला अध्यक्ष तुलेषा नानवटकर , उपाध्यक्ष राखी परते , उपाध्यक्ष मीनाताई कळंबे , उपाध्यक्ष समर्थना देशभ्रतार , महामंत्री सुषमा मस्के , महामंत्री बबलीताई छानीकर , मंत्री मनिषाताई सिलारे , भाजपा कन्हान शहर युवा मोर्चा अध्यक्ष विक्की सोलंकी , महामंत्री विक्की उर्फ नवघरे , महामंत्री अमन घोडेस्वार , महामंत्री आकाश वाढनकर , उपाध्यक्ष रंजीत शिंदेकर , भाजपा कन्हान शहर अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी , महामंत्री अजय लोंढे , महामंत्री धम्मा पानतावने , उपाध्यक्ष दिपनकर गजभिए , भाजपा कन्हान शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमोल साकोरे ,नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , भाजपा कन्हान शहर माजी अध्यक्ष विनोद किरपान , प्रसिद्धि प्रमुख रुषभ बावनकर , सचिन वासनिक , मयुर माटे , शैलेश शेळके , सुरेश चावके , नारायण गजभिए , अनिता गायकवाड , अनुसया वानखेडे , सुर्यभान देशभ्रतार , क्रिष्णा मेश्राम , माया नारनवरे , रजनी चहांदे , सिमा टेकाडे , वनिता कारस्कर , दिनेश मनगटे , यशोधरा रामटेके , तराशी डहाटे , नरेश रंगारी सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .