*भारतातुन हत्तीरोगाचा पुर्णत: नायनाट व्हावा – संजय डांगोरे*
काटोल प्रतीनीधी –
काटोल – बुधवार दिनांक 29सप्टेंबर2021ला रिधोरा येथे हत्तीरोग तपासनी उद्घाटन प्रसंगी पंचायत समीती सदस्य संजय डांगोरे यांनी वरिल विचार मांडले.
हत्तीरोग हा क्युलेक्स डासामार्फत पसरनारा गंभीर आजार आहे.तो समुळ नस्ट होन्यासाठी शासनाकडुन दरवर्षी निशुल्क औषधोपचार केल्या जाते.यावेळी 6ते7 वर्षाच्या मुलां-मुलींचे तपासनी पथकाद्वारे निशुल्क रक्त तपासनी करुन हत्तीरोग किंवा फायलेरीया असल्यास दहा मिनीटामधेच सांगीतले जाईल.जर वरिल आजाराचे जंतुआढळल्यास निशुल्क औषधोपचार करन्यात येनार आहे.
तपासनीला आलेल्या मुलांचे स्वागत करुन त्यांना प्रमानपत्र संजय डांगोरे यांचे हस्ते प्रदान करन्यात आले.यावेळी साठपेक्षा जास्त मुलांची रक्त तपासनी केल्या गेली.
यावेळी तपासनी पथक प्रमुख डाँ अनिल मडावी,डब्लुएचओ चे दिपक सोनटक्के,आरोग्य विभागाचे एस.वाय.माटे,लँब टेक्नीशियन संजय हांडे,हत्तीरोग निरीक्षक श्री शेंगर,श्री विकास सानप,सौ बोबडे,श्री गुल्हाने,जनार्दन वावरे,गढलेवार तथा आरोग्यसेवीका ,अंगन वाडी सेवीका यांची यावेळी उपस्थीती होती.