*जिल्हा परिषद निवडणूक होणाऱ्या ठिकाणी स्थानिक सुटी जाहीर*

*जिल्हा परिषद निवडणूक होणाऱ्या ठिकाणी स्थानिक सुटी जाहीर*


नागपूर  : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील रिक्त पदाच्या पोट निवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण व हिंगणा या तालुक्यात असून त्याच ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित निवडणूक असलेल्या गटाच्या निर्वाचन गणाच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात नरखेडमध्ये 2 गटासाठी (जि.प. मतदार संघ) 12, काटोल 2 गटासाठी 8, सावनेर 2 गटासाठी 5, पारशिवनी 1 गटासाठी 4, रामटेक 1 गटासाठी 9, मौदा 1 गटासाठी 7, कामठी 2 गटासाठी 9, नागपूर ग्रामीण 1 गटासाठी 3, हिंगणा 3 गटासाठी 16, कुही 1 गटासाठी 6 असे एकूण 16 जिल्हा परिषद मतदार संघात 79 उमेदवार रिंगणात आहेत. तर 31 पंचायत समिती गणात 125 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …