*आधार कार्ड केन्द्र संचालकानी तहसील अधिकार्यांच्या नावाने सुरु केली ग्रामीणांची लुट* *नवीन आधार कार्ड बनवण्या व किरकोळ सुधारनेच्या नावावर पाचशे,हजार दोन हजाराची मागणी*

*आधार कार्ड केन्द्र संचालकानी तहसील अधिकार्यांच्या नावाने सुरु केली ग्रामीणांची लुट*

*नवीन आधार कार्ड बनवण्या व किरकोळ सुधारनेच्या नावावर पाचशे,हजार दोन हजाराची मागणी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः भारत सरकारने आधार कार्डाला अत्यावश्यक दस्त म्हणून प्रत्यक नागरिकांजवळ आधारकार्ड असने बंधनकारक केले आहे.त्याशिवाय कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ अथवा रेशन,शाळा,बँक खाते व इतर कार्य करता येत नसल्याने नवीन आधारकार्ड बनविण्यासाठी तसेच किरकोळ सुधारणा करण्याकरिता शासनाने नेमुन दिलेल्या आधारकार्ड केन्द्रावर नागरिकांची गर्दी होत आहे अश्याच गर्दीचा फायदा उचलण्याचा सपाटा खापा येथील “आँस्क कम्यूनिकेशन महा ई सेवा केन्द्र संचालक आशिष कुंभारे यांनी चालवील्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे*

*केद्र शासनाच्या यु.आय.डी.ए.आय तसेच राज्य शासनाच्या महा ई सेवा केन्द्र आय.टी च्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा व तहसील कार्यालयाच्या नियंत्रणात सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.परंतु सावनेर तालुक्यातील खापा नगरपालिका हद्दीतील आँस्क कम्यूनिकेशन महा ई सेवा केन्द्र खापा येथे नवीन आधारकार्ड तयार करणे तसेच किरकोळ सुधारणा करवून घेण्या आड पाचशे ते दोन हजार रुपयांची मागणी केल्या जात असल्याचे वुत्त असुन मोफत मिळणाऱ्या अर्ज नमुन्याचेही दहा रुपये घेऊण गोरगरीब ग्रामीणांची खुली लुट करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे*


*मिळालेल्या माहितीनुसार आँस्क कम्यूनिकेशन केन्द्र खापा चे संचालक आशिष कुंभारे यांच्या विरूद्ध समाजसेवी चैतराम उईके व इतर नागरिकांनी मा.तहसीलदार सावनेर तसेच जिल्हाधिकारी नागपुर यांना लेखी तक्रार करुण तहसील कर्मचारी अधिकारी यांच्या नावाने सुरु असलेला गैरप्रकार थांबविण्याची मांगणी केली आहे*
*सदर आधारकार्ड केन्द्रावर सदर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समाजसेवी चैतराम उईके व त्यांच्या साथीदारांना कळताच तक्रारीची शहनिशा करण्याच्या हेतूने सदर आधारकार्ड केन्द्रावर पोहचून परिस्थिती जानण्याचे प्रयत्न केले असता केन्द्र संचालक आशिष कुंभारे हे थेट तहसीलदार व तहसील कर्मचारी व अधिकारी यांना हिस्सा द्यावा लागतो,तुम्हांला बनलायचा असेल तर बनवा नाहीतर जीथे फुकटात बनत असेल तीथे जा.ज्यांना तक्रारी करायच्या आहे खुशाल करा चा राग आलापू लागले परंतू संगणक व सोशल मिडीयाच्या काळात त्यांची ही अरेरावी मोबाईल कँमेर्यात कैद होत आहे याचे त्यांना भान राहीले नाही व त्यांची ही दबंगगीरी त्यांच्याच अंगलट येऊण त्यांचे पीतळ उघड पडले*

*एकिकडे कोरोना व नैसर्गिक आपत्यानी खीळखीळ झालेली अर्थव्यवस्था व जनजीवन अश्यात होत असलेली ग्रामीण जनतेची आर्थिक लुट तातडीने थांबविण्याची मागणी मा.तहसीलदार व जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनातून चैतराम उईके,लक्ष्मीकांत गागाटे,मोहसिन पठाण,हरीश पराते,जितेंद्र नवले सतीश लांजेवार , पवन सदावर्ते अफसर छवारे , चैत्राम उईके, निलेश रोकडे, निलेश मारोतकर, शुभम शेंडे ,मिलिंद बुरडे आदिंनी केली आहे.


समाजसेवींनी दिलेले निवेदने व बोलत्या पुराव्यावर सावनेर तहसील ला नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रताप वाघमारे काय पाऊल उचलतात यावर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहे हे विशेष.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …