*पंचायत समिती कार्यालयासमोर रोजगार सेवकांचे आज गांधी जयंतीदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*
उपसंपादक – योगेश कोरडे
कळमेश्वर – महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती कळमेश्वर तालुक्याच्या वतीने रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासह अन्य मागण्यांकरिता आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीच्या औचित्याने कळमेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. रोजगार सेवक संघटनेचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र जिचकार वासुदेव गोतमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.