*वाघाने केली गाय म्हशीची शिकार*

*वाघाने केली गाय म्हशीची शिकार*


*केळवद वन परिक्षेत्रातील रायबासा क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वाढत्या वावराने भीतीचे सावट*


*वन्य अधिकारी कर्मचारी यांच्या कारभारावर गावकरी संतप्त*
*पिडित शेतकर्यांस तात्काळ मोबदला देण्याची मागणी*

*प्रतिनिधी आशीष लोधी*

*सावनेर तालुक्यातील केळवद वन परिक्षेत्रात असलेल्या रायबासा शिवारात वाघाने एकाच वेळी गाय व म्हशीची शिकार केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे*
*मिळालेल्या माहितीनुसार दि.30 ला ग्रामपंचायत रायबासाचे सरपंच सोनू रावसाहेब हे सकाळी आपल्या शेतात जात असतांना रस्त्यावर असलेल्या संजय पील्ले या शेतकर्यांच्या गोठ्यात म्हशी जोरात हंबरत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गोठ्यात जाऊन बघितले असता एका म्हशीची वाघाने शिकार केल्याचे दिसताच त्यांनी लगेच शेतकरी संजय पील्ले यांना शेतात घडलेला प्रकार सांगताच त्यांच्या सोबत काही गावकरी मंडळी घटनास्थळी पोहचून वन अधिकारी यांना सुचना देऊण वाघाची शोधाशोध करत असतांनाच काही अंतरावर एक गाय तडफत असल्याचे आढळून आले व भीतीचे वातावरनिर्माण झाले तडपत असलेल्या गाईला लगेच उपचार मीळावा या हेतुने पशु वैधकीय अधिकारी यांना बोलावण्यात आले परंतू तोवर गाईची प्राणजोत मावळली*
*मिळालेल्या सुचनेवर वन अधिकारी पोहचले असता त्यांना संतप्त गावकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले गावकर्यांनी क्षेत्रात वाढत असलेल्या वन्यप्राण्यांचा हौदस तातडीने कमी करण्या करिता उपाययोजना आखावी तसेच पीडित शेतकर्यांच्या झालेल्या चाळीस हजार रुपयाची त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे*
*रायबासा गावाला लागतच केळवद वन परिक्षेत्र असल्याने हिंसक वन्यप्राण्यांच्या अश्या घटना सातत्याची बाब झाली असल्याने गावकरी मंडळीत भीतीचे वातावरण व्यप्त असुन या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त लावला नाही तर एखादी जिवीत हानी नाकारता येत नाही*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …