*कु. आयशा वसंतराव लांबट यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव*
नागपुर – टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा. पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचा आदेशानुसार तसेच मा.श्री. संदीपभाऊ गिरपुंजे यांचा मार्गदर्शनात आज कु. आयशा वसंतराव लांबट (मु.खापा) यांची MPSC च्या परीक्षेत यश मिळवून (RFO) वन विभाग अधिकारी या पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल टायगर ग्रुप खापा (ता. सावनेर) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याआधी 23 ऑगस्ट 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र उत्पादन शुल्क या विभागात PSI व नोव्हेंबर 2018मध्ये ASO म्हणून निवड झाली होती. सध्या आता त्या महाराष्ट्र उत्पादन शुल्क या विभागात PSI या पदावर अकोला येथे कार्यरत आहे.
तसेच उपस्थित सर्व टायगर ग्रुप खापा आणि मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या .