*जड वाहनांवर बंदी , दोन पोलीस शिपाई तैनात करा* *आमदार आशिष जयस्वाल यांचे पोलीस निरीक्षकांना आदेश*

*जड वाहनांवर बंदी , दोन पोलीस शिपाई तैनात करा*

*आमदार आशिष जयस्वाल यांचे पोलीस निरीक्षकांना आदेश*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती चे ओव्हर लोड जड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार , कन्हान पोलीस विभागाला व संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली असता कन्हान – पिपरी नगरपरिषद मध्ये सोमवार दिनांक २७ सप्टेंबर ला दुपारी १२:३० वाजता रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये ३० सप्टेंबर पासुन कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . परंतु नागरिकांच्या जीवेशी खेळ करत ट्रक चालकांनी आपले जड वाहतुक ३० सप्टेंबर ला सकाळ पासुन कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जाणे येणे सुरु केल्याने नागरिकांनी दुपार च्या सुमारास रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात व शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , सह आदि च्या नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गहुहिवरा चाचेर मार्गावर चक्का जाम करुन जड वाहतुक बंद केली व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांना आमदार आशिष जयस्वाल यांनी गहुहिवरा चौक येथे दोन पोलीस कर्मचारी ठेवण्याचे आदेश दिले आहे .


कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद करण्याचा मागणी करिता शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री वर्धराज पिल्ले शिवसेना यांनी शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर ला कन्हान पोलीस प्रशासनाला लेखी स्वरुपात पत्र देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली असुन बुधवार दिनांक २२ सप्टेंबर ला कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी कन्हान पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गहुहिवरा चाचेर मार्गावरुन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली असता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे दिनांक ८ सप्टेंबर ला सर्व साधारण सभा आयोजित करुन सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता . परंतु गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद न झाल्याने सोमवार दिनांक २७ सप्टेंबर ला कन्हान – पिपरी नगर परिषद येथील सभागृहात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये ट्रांसपोर्टर मालक , आरटीओ अधिकारी ,कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे , नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले ,सह आदि संबंधित अधिकार्यांचा व नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर महामार्गा वरुन जड वाहतुक ३० सप्टेंबर पासुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . परंतु नागरिकांच्या जीवेशी खेळ करत ट्रक चालकांनी आपले जड वाहतुक गुरुवार ३० सप्टेंबर ला सकाळ पासुन कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जाणे येणे सुरु केल्याने स्थानिक नागरिकांनी दुपार च्या सुमारास रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात व शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , शिवसेना महिला शहर प्रमुख मनिषा चिखले सह आदि नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गहुहिवरा मार्ग वर चक्का जाम करुन जड वाहतुक बंद केली व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांना आमदार आशिष जयस्वाल यांनी गहुहिवरा चौक येथे दोन पोलीस कर्मचारी ठेवण्याचे आदेश दिले आहे .
या प्रसंगी चिंटु वाकुडकर , हरीष तिडके , शुभम येलमुले , शमशेर पुरवले , सोनु खान , छोटु राणे , सुरेश चावके , प्रशांत गजभिए , अनिल ठाकरे , दामोदर बंड , विनोद पात्रे , लता लुंढेरे , वैशाली श्रीखंडे , लीना हारोडे , सह आदि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते ,

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …