*वन्यजीव सप्ताह निमित्ताने अंबाझरी जैवविविधता उद्यानात निसर्ग भ्रमंतीचे आयोजन*

*वन्यजीव सप्ताह निमित्ताने अंबाझरी जैवविविधता उद्यानात निसर्ग भ्रमंतीचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले

नागपुर:- नागपुर वनविभाग व WWF-INDIA च्या संयुक्त विद्यमाने डॉ. भारतसिंग हाडा, उप वनसंरक्षक, नागपूर व अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह निमित्ताने निसर्ग भ्रमंती चे आयोजन करण्यात आले होते.

निसर्ग भ्रमंती साठी 45 पेक्षा अधिक निसर्ग प्रेमींनी हजेरी लावली त्यात 6 ते 50 वयोगटातील निसर्ग प्रेमी सहभागी होते. अजिंक्य भटकर यांनी वन्यजीव सप्ताह, त्याचे महत्त्व तसेच विविध पक्षी व प्राण्यांच्या बद्दल महत्त्व पूर्ण माहिती दिली. आशिष निनावे, वन परिक्षेत्र अधिकारी, हिंगना यांनी अंबाझरी उद्याना बाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर श्रीमती परिणीता फुके, नगरसेविका तथा,JFMC मेंबर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून टीम चे कौतुक केले आणि सहभागीना मार्गदर्शन केले. शुभम छापेकर, बॉयलॉजिस्ट, गोरेवाडा प्राणी संग्रहालय तसेच टीम च्या अमन, ममता, आदित्य व इतर सदस्यांनी विविध कीटक,फुलपाखरे आणि पक्ष्यांची माहिती दिली. सहभागी निसर्ग प्रेमींनी भ्रमंती दरम्यान सूक्ष्म किटक तथा फुलपाखरांचे आगळे वेगळे विश्व उलगडून पाहिले. निसर्ग प्रेमींना पक्षी निरीक्षण करतांना रेड मुनिया, खाटिक, कोतवाल, खंड्या, निळ्या शेपटीचा राघू, माळ भिंगरी, साधा वटवट्या व इतर बरेच पक्ष्यांची नोंद केली. सुनील फुलझेले, वनपाल, आरती भाकरे,वनरक्षक, आशिष कोहळे पीफए, जीवन चौधरी अविनाश पराते, गिरडकर, रामेश्वर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेत.
“आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता निसर्गात आढळणार्‍या विविध घटकांची माहिती मला मिळाली मला पुन्हा पुन्हा निसर्ग भ्रमंती साठी यायला आवडेल ” असे मनोगत श्लोक धुर्वे इयत्ता सातवीत असलेल्या विद्यार्थ्यांने व्यक्त केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …