*घटस्थापनेच्या दिवशी मंदीराचे व्दार भक्तासाठी उघडे आस्था, करूणा, भावनेने घेतले कोराडी येथील श्रीमहालक्ष्मी मातेचे भक्तानी दर्शन*

*घटस्थापनेच्या दिवशी मंदीराचे व्दार भक्तासाठी उघडे आस्था, करूणा, भावनेने घेतले कोराडी येथील श्रीमहालक्ष्मी मातेचे भक्तानी दर्शन*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- राज्य शासनाने उत्तम निर्णय घेतल्याने आज घटस्थापना च्या दिवशी दिड वर्षापासून बंद असलेले मंदीराचे व्दार उघडण्यात आले असून भाविकाने कोराडी वासिनी श्री महालक्ष्मी मातेचे स्वयंभू दर्शन घेतले तसेच भाविकांमध्ये खुशीचे वातावरण दिसून आले.

कोरोणा महामारीमुळे संपुर्ण मंदीरे बंद होती त्यामुळे कोणालाच कुठेच येता जाता येत नव्हते त्यामुळे कोराडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर बंद ठेवण्यात आलेले होते आज पासून कोराडी देवी मंदीरात मोठी यात्रा भरलेली आहे तसेच कोविड-१९ चे कोटेकोरपणे पालन करण्यात येत आहे आज दुपारी १२ वाजता घटस्थापनेचा शुभ मुर्हत असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते तसेच पुजा-यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करण्यात आले सकाळ पासूनच मातेचे दर्शनाकरिता भाविकांची मंदीयाळीच लागलेली होती. प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय मातादीचा गजर मंदीर परिसरात घुमत होता मातेचा शूगार, आरती, भोजन, नवैध चढवून दर्शनाकरिता लोकांनी मोठी गर्दी केली होती. कोराडी मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …