*पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आला*
वरोरा प्रतिनिधि – मुजम्मिल शेख
वरोरा – महामारी च्या या काळात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोणा रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये डेंगू, मलेरिया, मेंदु ज्वर सारखे आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि किटकनाशक फवारणी करने आवश्यक झाले आहे.
आपल्या शहरात स्वच्छता कशी राहील या उद्देशाने वरोरा नगरीचे लोकप्रिय नगरसेवक छोटू भाऊ शेख यांनी स्वतः या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात त्यांनी स्वतः फवारणी केली आहे. वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा झाडे वाढून अस्वच्छता होत होती आणि आपलं सर्वांना संरक्षण देणारे पोलीस बांधव डेंगू,टायफाईड अशा आजारापासून त्यांचा बचाव होण्याकरिता परिसरात कामगार व मशीन द्वारा कचरा झाडे कापून परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात आली. सदर मोहीम पोलीस स्टेशन वरोरा आणि नगरसेवक छोटुभाई शेख संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित राहून सहकार्य करताना वरोरा पोलीस निरीक्षक श्री दिपक खोब्रागडे साहेब, नगरसेवक शेख जैरुद्दीन छोटू भाई व कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करणारे पत्रकार प्रवीण भाऊ खिरटकर, हितेश राजनहिरे, सतिश चव्हाण, लखन केशवानी, सामाजिक कार्यकर्ते कैसर शाह, शेषराव भोयर, सुरज पाठक ,श्री पटेल व कामगार यांनी सहकार्य केले.