*वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*

*वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किमी अंतरावर असलेल्या वराडा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एमएचकेएस पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपीने डिझल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.६ ऑक्टोंबर २०२१ ला रात्री ११:३० वाजता ते गुरुवार दिनांक.७ ऑक्टोंबर २०२१ ला सकाळी ४:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी दिनेश गोपाल बावीसताले वय ३८ वर्ष राहणार. खैरी जिल्हा बालाघाट याला ट्रक चालकांनी फोन करून सांगितले कि ट्रक क्रमांक एमपी ०४ एच ई ४३३५ हा एमएचके एस पेट्रोल पंप वराडा येथे डिझेल भरून सर्विस रोड वर लावुन रात्री ट्रकच्या कैबिन मध्ये झोपला असता कोणीतरी अज्ञात चोराने ट्रकचे डिझल टॅंक मधुन अंदाजे ४५० लीटर डिझेल किंमत ४३,००० रूपयाचे चोरून नेल्याच्या फिर्यादी दिनेश बावीसताले यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक. ३७३/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात हेड कांस्टेबल नरेश वरखडे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …