*कोराडी वीज केंद्राच्या ४५ व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता*

*वीज क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वीकारून पुढे जावे लागेल …..नितीन चांदुरकर

*कोराडी वीज केंद्राच्या ४५ व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता*

 

*वऱ्हाडी तडका “लाव रे तो व्हिडीओ” ने पोटभर हसविले*

*रक्तदान, संगीत रजनी, आनंद मेळावा, क्रीडास्पर्धा ठरले विशेष आकर्षण*

*कोराडी प्रतिनिधी- दिलीप येवले*

 

महानिर्मितीमध्ये माहिती तंत्रज्ञांनाच्या सहाय्याने भरपूर सिस्टीम बेस सुधारणा केल्याने कामे सुलभ व अचूक होण्यास मोठा हातभार लागला आहे. वीज क्षेत्रात सर्वदूर प्रचंड स्पर्धा आहे, रोज नवनवीन आव्हाने आहेत यावर स्वयंचलित पद्धतीने सकारात्मकरित्या मार्ग काढून आपल्याला पुढचा मार्ग सुकर करावा लागणार आहे. अश्या पार्श्वभूमीवर कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची प्रगतीमय वाटचाल सुरु असल्याचे समाधान समारंभाचे प्रमुख पाहुणे नितीन चांदुरकर कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) महानिर्मिती यांनी केले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४५ व्या वर्धापन दिनाच्या समारोपीय समारंभात ते विद्या मंदिर कोराडी येथे बोलत होते.

मंचावर विशेष अतिथी म्हणून मुख्य अभियंते राजकुमार तासकर, अनंत देवतारे, प्रकाश खंडारे,दिलीप धकाते, विवेक रोकडे, उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार सुनील सोनपेठकर, राजेश कराडे,वर्धापन दिन सचिव गजानन सुपे प्रामुख्याने उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी भूषविले.

वर्धापन दिन समितीचे सचिव गजानन सुपे यांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्तुत्य उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाची अहवाल वाचनातून माहिती दिली. वर्धापन दिन हे संवादाचे माध्यम आहे त्यातून सकारात्मक मार्ग निघत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांनी स्थानिक ज्वलंत प्रश्नांविषयी आपले विचार व्यक्त केले.

प्रारंभी महानिर्मितीच्या राज्यभरातील मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन प्रवीण बुटे यांनी केले तर प्रास्ताविकातून राजकुमार तासकर यांनी वर्षभरातील महत्वपूर्ण कार्यांचा मागोवा घेतला. राष्ट्र उभारणीत कोराडी वीज केंद्राचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून राजेश पाटील म्हणाले कि कोराडी येथील कुशल मनुष्यबळामध्ये वीज क्षेत्रातील नवीन प्रयोग, संस्कृती स्वीकारण्याचे सामर्थ्य असल्याने या केंद्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मागील काही महिन्यांत कोळसा हाताळणी विभागाने भरपूर मेहनत घेतली असून आगामी काळात त्याचे रुपांतर अधिक वीज उत्पादनात नक्की दिसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुख्य अभियंते अनंत देवतारे, विवेक रोकडे व प्रकाश खंडारे यांनी समयोचित भाषणे केली.

रक्तदान, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम,टेबल टेनिस, ब्रीज, रांगोळी, चित्रकला, मॅरेथोन, स्वच्छता अभियान, हाउसकीपिंग, प्रश्नमंजुषा, आनंद मेळावा, हौजी, कराओके, संगीत रजनी, पूजा व वऱ्हाडी तडका “लाव रे तो व्हिडीओ” असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

कोराडी वीज केंद्रात उत्तम कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहिन्याला “बेस्ट कर्मचारी” म्हणून सन्मान करण्यात येतो. वर्धापन दिनाला उत्तम कार्य करणाऱ्या विभागांना टीमला सन्मानित करण्यात आले त्यात प्रामुख्याने कार्यकारी अभियंता(संचलन) पी.डब्ल्यू. रामटेके, कोळसा हाताळणी विभागाचे उप कार्यकारी अभियंता ए.ए.चिमलवार, सी.एंड आय. विभागाचे एस.बी.गायकवाड, जल प्रक्रिया विभागाचे तंत्रज्ञ-२ एस.डी.कनिरे, कोळसा हाताळणी विभागाचे तंत्रज्ञ-३ ए.एस.गिरडकर यांचा प्रामुख्याने सहभाग होता. जागतिक स्पर्धेत सुंदर हस्ताक्षर प्रथम पारितोषिक पटकाविल्याबद्दल लक्ष्मण बावनकुळे, तसेच राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला.

*वऱ्हाडी तडका “लाव रे तो व्हिडीओ”:*
वैदर्भीय भाषेतील व्यंगात्मक शैलीतील वऱ्हाडी तडका “लाव रे तो व्हिडीओ” यामधून कोराडी वीज केंद्र व परिसरातील दैनंदिन घडामोडी, बोली भाषा, कामकाजाच्या ठिकाणचे किस्से-चिमटे उपस्थितांच्या मनाला भावले व सलग ३५ मिनिटे प्रेक्षकांना आपल्या दमदार सादरीकरणातून ह्या कलावंतांनी मनसोक्त हसविले व सोबत प्रबोधनात्मक संदेश देखील दिला. ह्यामध्ये लेखन-दिग्दर्शन दिवाकर देशमुख, संगीत राजू अलोणे,शंकर शंखपाळे, नितीन तायडे, कलावंत – मिलिंद गवई, जयंत भातकुलकर, रोहित वानखेडे, प्राची वरठे, अक्षय भोकरधनकर, आकाश पुंड यांचा समावेश होता.

वर्धापन दिन सांगता समारंभाला अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, नारायण राठोड, कन्हैयालाल माटे, विराज चौधरी, डेगवेकर, अशोक भगत, डॉ.भूषण शिंदे, जगदीश पवार, महेंद्र जीवने, पांडुरंग अमिलकंठावार, पराग आंधे, शिरीष वाठ, डॉ.प्रकाश प्रभावत, पुरुषोत्तम वारजूरकर, दिलीप वंजारी, अमरजित गोडबोले, तसेच कोराडी वीज केंद्राचे अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कुटुंबीय, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये वर्धापन दिन आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समारंभाचे सूत्र संचालन मिनल भटकर, पूजा महल्ले, आशिष पहुरकर, प्रवीण बुटे, राजेश गोरले यांनी तर उपस्थितांचे आभार कल्याण अधिकारी प्रसाद निकम यांनी मानले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …