*सरस्वती चे विद्यार्थी नशा मुक्त भारत अभियान स्पर्धेत प्रथम*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूल बोखारा मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ दिनानिमित्त टाटा ट्रस्ट उडान यांच्या माध्यमातून नशा मुक्त भारत या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेमध्ये वर्ग सातवा व वर्ग आठवा यांनी सहभाग घेतला .या स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर सोनाली तडस तसेच जिल्हा मेंटल हेल्थ प्रोग्राम नागपूरचे सदस्य प्रवीण काकडे, ज्ञानेश्वर डोईफोडे तसेच हिमाली खंगारे ,अतुल माहुले कार्यक्रमाचे संघटक देखील लाभले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धेचा निकाल लावण्यात आला . स्पर्धेचे पारितोषिक सरस्वती भवन कॉन्व्हेंट व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धक वर्ग सातवी ची कू.गरिमा बारंगे प्रथम तर वर्ग आठवीची कु. भाग्यश्री शुक्ला हिने द्वितीय क्रमांक पटकविला .स्पर्धेच्या यशस्वितेकरिता सहाय्यक शिक्षक अर्चना साऊरकर व लक्ष्मी तिवारी मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला खान मॅडम, रितिका मॅडम, पुनम चव्हाण मॅडम यांचे देखील सहकार्य लाभले.