*भाऊबीजेला आलेल्या मुलीचा ट्रक अपघातात मृत्यू*

*भाऊबीजेला आलेल्या मुलीचा ट्रक अपघातात मृत्यू*


*दहेगाव (रंगारी) फाटा येथील घटना*


*वडील व मुलगा बालबाल बचावले*

*खापरखेडा प्रतिनिधी- दिलीप येवले*

दिवाळी सना निमित्त भाऊबीजेसाठी माहेरी बहिण आली मात्र सासरी परत जात असताना एका ओव्हरलोड ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला मन हेलावून टाकणारी घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रंगारी) फाटा परिसरात 2 नोव्हेंबर ला दुपारी 2 च्या सुमारास घडली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेत वडील व मुलगा बालबाल बचावले मृतक महिलेचे नाव सौ माधुरी राहुल मोडक वय 35 रा रणाळा कामठी असे आहे मृतक माधुरी भाऊबीजे साठी आपल्या माहेरी वलनी वस्ती येथे वडील रमेश डोंगरे यांच्या घरी आली होती मधुरीचे वडील वेकोलीतून सेवानिवृत्त झाले आहेत तिला दोन भाऊ आहेत माधुरीने सासरची दिवाळी आनंदात करून दोन तीन दिवसा आधी माहेरी वलनी वस्ती येथे आली होती घटनेच्या दिवशी 2 नोव्हेंबर शनिवारला दुपारी 2 च्या सुमारास माधुरीचे वडिल रमेश डोंगरे व मुलगा शमिक यांच्यासह एक्टिव्हा क्रमांक एमएच-40-0897 ने वलनी वरून दहेगाव-खापरखेडा मार्गे रनाळा येथे जाण्यासाठी निघाली मात्र यावेळी नियतीला काही वेगळेच मंजूर होते दहेगाव फाट्यावरून खापरखेडा कडे जात असतांना दहेगाव जाणारा वाळूने भरलेला ओव्हरलोड ट्रक क्रमांक एमएच-बीजी-9915 जात असताना दुचाकी स्लिप झाली यावेळी सदर ट्रकच्या चाकात आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला अक्षरशः तिच्या पार्थिवाचा चेंदामेंदा झाला मात्र यावेळी सुदैवाने मधुरीचे वडील रमेश वे मुलगा शमिक थोडक्यात बचावले यावेळी शेकडो नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती सदर घटनेची खापरखेडा पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले यावेळी घटनास्थळ पंचनामा करून माधुरीचे पार्थिव शवविच्छेदन करण्याकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले खापरखेडा पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असून ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रक चालक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे सदर ट्रक लऊकुमार बागडे रा खापा यांच्या मालकीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिल्लेवाडा,रोहना मार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांना या मार्गावर बरेच अडथळे येतात त्यामुळे वलनी वस्ती व परिसरातील नागरिक वलनी व्हाया दहेगाव, खापरखेडा मार्गाचा वापर करीत असतात मात्र ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यामुळे या मार्गावर सुद्धा अपघाताच्या घटना वाढल्या आहेत घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी दंगा नियंत्रण तुकडीला पाचारण केले होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …