*कन्हान येथे बंद ला अंशत: प्रतिसाद*
*महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी केंन्द्र सरकारच्या विरोधात केले जोरदार प्रदर्शन*
*हत्याकांड च्या आरोपींला फाशी देण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना चिरडुन टाकण्याचा निषेधार्थ संपुर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे आवाह न राज्याच्या महाविकास आघाडी सरकार द्वारे करण्यात आल्याने कन्हान येथे महाविकास आघाडी पार्टी पदाधिकार्यांनी भाजपा शासित केंन्द्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढुन जोरदार निदर्शने करून कन्हान शहरातील व परिसरातील दुकाने बंद करून क्रुर हत्याकांड च्या आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडी कन्हान शहर
सोमवार दिनांक .११ ऑक्टोंबर ला महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकार द्वारे क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याच्या समर्थनात कन्हान महाविकास आघाडी सरकारच्या पदाधिकार्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांच्या नेतृत्वात गांधी चौक ते सात नंबर नाका पर्यंत केंद्र सरकार च्या विरोधात मोर्चा काढुन जोरदार निदर्शने करून शहरातील व्यापारांची दुकाने बंद केली असुन क्रुर हत्याकांडाचा आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. या प्रसंगी कन्हान – पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, शिवसेना शहर प्रमुख छोटु राणे, महिला शहर प्रमुख मनिषा चिखले, कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव, नगरसेवि का कल्पना नितनवरे, डॉ शुभांगी बोंदरे, गणेश माहुरे, पंकज गजभिये, राष्ट्रवादी काॅंग्रेस चे किशोर बेलसरे, देविदास तडस, पुरणदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर, संगीत भारती, राकॉ शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, आनंद बेलसरे, डॉ कमलेश शर्मा सह महाविकास आघाडी सरकार चे पदाधिकारी उपस्थित होते.
काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर व इंटक युनियन
काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर व इंटक युनियन द्वारे बंद च्या समर्थनात नागपुर जिल्हा ग्रामीण काॅंग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे, इंटक युनियन संघटन अध्यक्ष श्री एस क्यु जमा, महिला शहर अध्यक्ष रिता बर्वे यांच्या नेतृत्वात तारसा चौक ते गांधी चौक पर्यंत क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ मोर्चा काढुन भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून आरोपी वर कठोर कारवाई करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफाताई तिडके, पुष्पा कावडकर, कांद्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सदस्य राहुल टेकाम, सतिश भसारकर, शरद वाटकर, सदरे आलम खान, रोहित बर्वे, आकिब सिद्धिकी, निखिल तांडेकर, कुशल पोटभरे, प्रशांत मसार, दिपक तिवाडे, महेंद्र चव्हान, अजय कापसिकर, आकाश रहिले सह मोठ्या संख्येत काॅंग्रेस व इंटक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कांग्रेस कमेटी कन्हान शहर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांची चारचाकी वाहन खाली चिरडून क्रुर हत्या केल्याचा निषेदार्थ बंद ला समर्थन देत घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. असे निवेदन पोलीस निरीक्षक कन्हान मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना देण्यात आले. निवेदनात केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे देशात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाची धरोहर असलेल्या मोठ्या संस्था व्यापारी चरणी अर्पण केले गेले. ओबीसींचे आरक्षण तसेच इतरही आरक्षणा ला नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्या अनेक समस्या अभावी बंद ला समर्थन देत कन्हान राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नागपूर ग्रामिण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, रामटेक विधानसभा कार्यध्यक्ष अशोक पाटील, माजी सभापती देविदास जामदार, मोरेश्वर खडसे, महिला जिल्हा उपा ध्यक्ष शशिकला बागडे, दीप्ती संब्रित, पार्वती यादव, महेश हाथागडे, अंबादास खडसे, योगेश पोटभरे, नरेश सोनेकर सह बहु संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
आयटक चे कन्हान बंद ला समर्थन
आयटक महाराष्ट्र राज्य आंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन द्वारे पारशिवनी तहसिल सचिव व नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सौ सुनीता मानकर सह सर्व सेविका मदतनीस यांनी शेतकर्यांवर मोदी सरकारने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद ला समर्थन करून आरोपी विरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.