*अश्विन शु. पंचमीला मॉ काली मंदीरात घटस्थापनाने नवरात्र उत्सव सुरू*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पावन कन्हान नदी काठावरील मॉ काली मंदीरात घटस्षापना करून भजन, देवी जस कार्यक्रमाने अश्विन नवरात्र उत्सवास सुरूवात करून विविध धार्मिक कार्यक्रमाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.
रविवार दिनांक.१० ऑक्टोबंर २०२१ अश्विन शु. पंचमीला सकाळी ९ वाजता सत्रापुर रोड कन्हान नदी काठावरील मॉ काली मंदीरात पावन नदीचे जल आणुन मॉ काली मातेचे स्नान, अभिषेक करून घटस्थापना करून सायंकाळी ७ वाजता आरती नंतर भजन व देवी जस गायन नवरात्र उत्सावास सुरूवात करण्यात आली. शासनाच्या नियमाची काटेकोर पणे पालन करून दररोज सकाळ ल सायंकाळी आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून अश्नविन नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. करिता परिसरातील भाविक भक्तानी मॉ काली माते च्या दर्शनाचा लाभ ृघ्यावा असे आवाहन जय मॉकाली माता मंदीर सेवा ट्रस्ट व्दारे करण्यात आले आहे.