*आई नवदुर्गेला सावनेकरांचा भावपूर्ण निरोप* *पाहटे पासून मंदिरात भाविकांच्यि गर्दीने येत होते यात्रेचे रुप* *मनोकामना ज्योतींनी जगमगले पुरातन सटवा माता मंदीर*

*आई नवदुर्गेला सावनेकरांचा भावपूर्ण निरोप*

*पाहटे पासून मंदिरात भाविकांच्यि गर्दीने येत होते यात्रेचे रुप*

*मनोकामना ज्योतींनी जगमगले पुरातन सटवा माता मंदीर*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः शरदीय नवरात्र उत्सव जस जसे पुढे जात होतज तस तसे आई भवानीच्या दर्शनाची उत्सुकता भावीकांमधे वाढत असल्याने नगरीतील मंदिरात भावीक मंडळीची गर्दी दीसुन येत होती.

 

*मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने लादलेल्या निर्बंधाचे सावट सोबतच मंदिराचे कपाट सुद्धा बंद होते.परंतु या महिन्याच्या सुरुवाती पासुन राज्य शासनाने कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशात अधिकच शिथलता आनत मागील दोन वर्षापासून बंद असलेले मंदीरांची कपाटे उघडण्याची परवानगी दीली आणी लगेच नवदुर्गेच्या उपासनेच्या पर्वाला सुरुवात झाली.आणी भावीक मंडळीत एकच उत्साह संसरला*

*सुरु असलेल्या या नवरात्री उत्सवात मंदिरे विद्युत रोशनाई ने नाहुन निघाली.शहरातील पुरातन सटवा माता मंदिर,मरा माय मंदीर,जय माता दी दुर्गा मंदिर जुना धान्य गंज,दुर्गा मंदिर गडकरी चौक,माता मंदीर माताखेडी,शितला माता मंदिर पहलेपार,पुरातन माता मंदिर मोहपा रोड सह अन्य मंदिर व अनेक घरात आई दुर्गा भवानीच्या मनोकामना ज्योतीचे घट स्थापना करुण आई दुर्गेची उपासना मोठ्या उत्साहात केल्या गेली.*

*पहाटे पाच वाजता पासून सुरु होणाऱ्या आरती करिता भाविकांची गर्दी तर घरा मंदिरातून येणाऱ्या आई भवानीचा जागर व मधुर भजनांचा कर्णप्रीय सुर,पंचमी पासुन सुरु झालेल्या कन्या भोजनाकरिता खुशीत निघालेल्या चिमुकल्या बघून साक्षात दुर्गा माता आपल्या समक्ष असल्याचा जणूकाही आभास मन प्रफुल्लित करीत समुच्या नगरिचे वातावरण भक्तीमय झाले होते*

*तर जुना धान्य गंज परिसरातील दुर्गा मंदिर परीसरात मागील अनेक वर्षांपासून उघड्यावर सुरु असलेल्या चिकन व मासोळी बाजाराला इतरत्र हलवीण्याच्या भावीकांच्या मागणीला स्थानिक प्रशासनाव्दारे बगल दिल्या जात असल्याने भाविटांच्या भावना आहत होत असल्याने सदर मार्केट इतरत्र हलवून भावीकांच्या भावना जपण्याचे विनंती फलक लावून भाविक आपल्या भावना व्यक्त करत आहेत*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …