*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रा तर्फे आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रा तर्फे आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न*

खापरखेडा प्रतिनिधि – दिलीप येवले
खापरखेडा:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक २ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रा तर्फे सदभावना मनोरंजन गृह क्रमांक २, प्रकाश नगर वसाहत मध्ये आरोग्य तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरजीत गोडबोले (कामगार अधिकारी) औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम प्रमुख पाहुणे म्हणून अमरजीत गोडबोले, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पुरुषोत्तम मानकर (गुणवंत कामगार पुरस्कृत),
शंकर घोरसे ( कवी व कामगार नेते) दिलीप येवले ( पत्रकार) सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
गोडबोले (कामगार अधिकारी) यांनी आपल्या भाषणातून कंत्राटी कामगारा बद्दल माहिती दिली आणि असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. डॉ. गुंजन धुंडेले (MBBS) हड्डीरोग तज्ञ तसेच डॉ. जयस्वाल (MBBS) मधुमेह व हृदयरोग तज्ज्यांच्या डॉ. खान यांच्या हस्ते आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यांना काही आजार आढळून आले त्यांना मोफत औषधी देण्यात आली. डॉ.च्या चमुने सहयोग दिला.


आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाला नंदलाल राठोड (सहाय्यक कल्याण आयुक्त) विभागीय कार्यालय नागपूर तसेच प्रतिभा भाकरे (कामगार कल्याण अधिकारी) यांनी कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन दिले.
आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमात १४० कामगार कामगार कुटुंबिय व इतर सभासदांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.


कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शालु टेकाडे (केंद्र महिला कल्याण सहाय्यिका) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कोहळे (माजी संचालक), मंदा सोनुरकर , नलिनी बेंडेकर, नरेश तरारे , सुनिल ऊके, आशिष भालेराव, वैशाली अन्ड्रस्कर,उपस्थिती मध्ये रविंद्र खडसे (गुणवंत कामगार पुरस्कृत) यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …