*गोरगरिबांच्या लोकाभिमुख योजना गीळंकु्त करणाऱ्या
” व्हाईट काँलर “ धारकांना लवकरच धडा़ शिकवणार*
*रावण दहन मेळाव्यात मंत्री सुनील केदारांनी सत्ताधार्यांना धरले धारेवर*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेरः विजयादशमी निमित्ताने पार पडलेल्या रावण दहन मेळाव्यात क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सावनेर नगर परिषदेच्या सत्तेत असलेल्या सत्ताधारी मंडळीला धारेवर धरत पुढे काही महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा शंखनाद याप्रसंगी केला*
*दसर्या निमित्ताने आयोजित या भव्य आयोजनात शहरातील हजारो हजार नागरिकांची आवार्जुन उपस्थिती असते आणी या संधीचे सोनं करत मंत्री सुनील केदार यांनी नगर परिषदेच्या सत्तेत असलेल्यांना टार्गेट करत प्रश्नांचा भडीमार करत होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत नगरीचे गोरगरीब मतदाते नक्कीच जाब विचारणार असल्याची तंबी देत त्यांच्या प्रयत्नाने आलेल्या शहराच्या आरोग्यदायी 9 कोटी रुपयाच्या मल निस्सारन योजनेचे काय झाले…?,तत्कालीन केन्द्रीय मंत्री कमलनाथ यांच्या व्दारे शरीरातील रस्ते विकासासाठी आलेले 27 कोटी रुपयांचे रस्ते बनले का…?,शहरातील होतकरु खेळाडूंना हक्काचे पटांगण मीळावे याकरिता चालवीलेल्या विकास कामात कोण अडथडे निर्माण करत आहे,शहातील वसाहतीतील ओपन स्पेसवर डल्ला कोण मारत आहे…?घरकुल योजना आदी अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे व हिशोब शहराच्या गोरगरिबांना द्यावे लागतीलच.घोडामैदान जवळ आहे.क्षेत्राचा सालदार या नात्याने क्षेत्रातील गोरगरिबांना न्याय मीळवून देणे व त्यांच्या हक्काकरिता लढा देने माझे आद्द कर्तव्य असल्याचे याप्रसंगी बोलून दाखवीत त्यांना व त्यांच्या उम्मेदवारांना सावनेरकरांनी मागील 15 वर्षापासून सत्तेपासून दुर ठेवल्यामुळे नगरीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न व स्वप्ने अपुरी असल्याची खंत नकळतच बोलून दाखवली हे विशेष…*