*वृध्द महिलेची गळफास लावुन आत्महत्या*
*कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत संताजी नगर कांद्री-कन्हान येथील वृध्द महिला सौ फुलवंती जयचंद चौधरी हिने आजाराला कंटाळुन घरातील छताच्या पंख्याला साडी साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.१३ ऑक्टोंबर ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान संताजी नगर कांद्री-कन्हान येथील सौ फुलवंती जयचंदजी चौधरी वय ५७ वर्ष या वृध्द महिेने आजाराला कंटाळुन आपल्या घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी पती श्री जयचंद गणपत चौधरी वय ६० वर्ष राहणार. संताजी नगर कांद्री-कन्हान यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्रमांक ४०/२१ कलम १७४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .