*अंदाजे आठ ते दहा फुट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला समाजसेवींच्या प्रयत्नातून मिळाले जिवनदान*
*समाजसेवी हितेश बन्सोड व सहयोगींच्या प्रयत्नाला यश*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – सायंकाळी रेमंड कॉलोनी सावनेर येथे चालू असलेल्या घरघुती बांधकामाकरिता खोदलेल्या पायव्याच्या खड्यात एक गाय अचानक पडली*
*खड्डा खोल व जास्त रुंद नसल्याने खड्यात पडलेल्या गायीचा जीव घाबरू लागल्याने ती हंभरू लागली व तीच्या हंभरण्याचा आवाज एकूण प्लाट घारक इंद्रजित नानवटकर यांनी समाजसेवी हितेश बनसोड यांना सुचना दीली.सुचना मिळताच हितेश बन्सोड यांनी आपले सहयोगी उमेश मोरे,आनंद श्रीवास्तव,रजत रुषीया,राजा फुले आदिंसह घटनास्थळी धाव घेतली*
*घटनास्थळी पोहचून बधीतले असता गायीची दयनीय दशा व इतक्या मोठ्या खड्ड्यातून भारीभरकम सोबत गरोदर दिसणार्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी जेसीबीची आवश्यकता भासल्यामुळे महेश दहिहांडे यांना विनंती केली असता ते स्वतः आपली जेसीबी घेऊण घटनास्थळी पोहचले व संपूर्ण टीम वर्क करुण गौ माता ले त्या खड्यातुन बाहेर काढण्यात आले*
*हितज्योती फांऊंडेशन च्या माध्यमातून बेवारस,निराश्रितांच्या मदतीला धावणाऱ्या हितेश बंन्सोड व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे*