*अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पकडली*
*महसुल विभागाची कारवाई , पुढील आदेशा पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला केले स्वाधिन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड रेल्वे फाटक जवळ एम जी नगर येथे अवैध रेतीची वाहतुक करणारा टैक्टर जात असतांना कन्हान तलाठी महेंन्द्र श्रीरसागर यांनी टैक्टर ला थांबवुन सखोल विचारपुस केली असता रेतीची अवैध वाहतुक करतांना मिळुन आल्याने पुर्ण कारवाई होई पर्यंत ट्रैक्टर ट्रॉली जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला स्वाधिन करण्यात आले.
कन्हान शहरात व परिसरात रेतीचा बिना नंबर च्या टैक्टर ट्रॉली व ट्रक व्दारे अवैधरित्या रेती चोरी सुरू असुन कन्हान पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी व महसुल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मुंग गिळुन गप्प तर नाही ना अश्या चर्चेला उधाण येत असल्याने सोमवार दिनांक.१८ ऑक्टोंबर २०२१ ला दुपारी सवा बारा (१२:१५) वाजता च्या दरम्यान ट्रैक्टर क्रमांक. एम एच ४० एल ८००९ हा तारसा रोड रेल्वे फाटक एम जी नगर कन्हान जवळ जात असतांना कन्हान तलाठी हयांनी ट्रॅक्टर ला थांबवुन विचारपुस केली असता विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतुक करीत असतांना कन्हान पटवारी महेंन्द्र श्रीरसागर यांना मिळुन आल्याने त्यांनी टॅक्टर ला पकडुन जप्त करित तहसिलदार पारशिवनी यांच्या कार्यालयात जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) कारवाई करून आरोपी १) टैक्टर मालक अशोक पाठक २) चालक पुंडलिक रामाजी सुर्यवंशी राहणार. पिपरी यांचे विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर प्रकरणाची कार्यवाही पुर्ण होई पर्यंत व पुढील आदेशा पर्यंत ट्रॅक्टर, ट्रॉली ही कन्हान पोलीसा च्या स्वाधिन करण्यात आली. ही कारवाई पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनात कन्हान तलाठी महेंन्द्र श्रीरसागर, कांद्री तलाठी संजय भोसले, टेकाडी तलाठी संकेत पांलादुरकर हयांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.