*कन्हान पोलीसांनी अवैध रित्या १ बैल व ५ गाय कोंबुन भरून नेतांना पकडले*
*कारवाई दरम्यान १ बैल, ४ गायांना जिवनदान देऊन स्कार्पियो वाहना सह एकुण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस आपल्या हदी मध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मनसर कडुन कामठी कडे जाणाऱ्या स्कार्पियो वाहनात अवैध वाहतुकीचा संशय आल्याने पाठलाग करून कन्हान रेल्वे फाटक बंद असल्याने चालक वाहन सोडुन पळाल्याने स्कार्पियो वाहनात १ बैल, ४ गाय व १ गाय मृत मिळाल्याने कन्हान पोलीसांनी पसार चालका विरूध्द गुन्हा दाखल करून व त्यांचा ताब्यातील स्कार्पियो वाहना सह एकुण २ लाख ६० हजार रूपयां चा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.१९ आॅक्टोंबर ला पहाटे सकाळी ४ ते ४. ३५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस आपल्या हदी मध्ये पेट्रोलींग करित असतांना मनसर कडुन कन्हान मार्गे कामठी कडे कथ्या रंगाची स्कार्पियो चारचाकी वाहन क्रमांक. एम एच १२ सी आर ८१९९ जात असताना अवैध वाहतुकीचा संशय आल्याने वाहन चालकास थांबण्यास सांगितले असता तो पळु लागल्याने पाठलाग केला असता पोलीस स्टेशन जवळील कन्हान रेल्वे फाटक बंद असल्याने चालक वाहन सोडुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी वाहना ची तपासणी केली असता स्कार्पियो वाहनात निर्दयी पणे आखुड दोरीने बांधुन १ बैल किंमत १५ हजार रूपए, ४ गाय किमंत ४० रूपए व १ मृत गाय किमत ५ हजार रूपए असा एकुण ६० हजार रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस शिपाई मंगेश सोनटक्के यांचे तक्रारीवरून पसार वाहन चालका विरूध्द अपराध क्रमांक ३८९/२१ कलम ४२९ भादंवि, प्रा छ प्र अधिनियम.कलम १९६० नुसार ११(१)(अ)(ड)(इ)(फ)(आय) म. प. स. अधिनियम १९७६ कलम ५ (अ)(ब), ९ सह कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून स्कार्पियो वाहन किंमत २ लाख रूपए. व ६० हजार रूपयाची जनावरे असा एकुण २ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून १ बैल व ४ गायींना देवलापार गोरक्षण येथे सोडुन जिवनदान दिले. तर पशु वैधकिय अधिकारी यांचे कडुन एका मृत गायीचे शवविच्छेदन करण्यात आले.
सदर प्रकरणाची कारवाई कन्हान पोलीस स्टेशन पोस्टे चे सफौ अमरसिंग भेलावेकर, पोलीस शिपाई मंगेश सोनटक्के, चालक नापोशि संदीप गेडाम यांनी ही कारवाई यशस्विरिता पार पाडली.