*विनयभंग*
सावनेरः पो.स्टे . सावेनर – दिनांक 29/07/2021 चे 10.00 वा . ते दिनांक 29 / 09 / 2021 चे 23.59 वा . दरम्यान 32 वर्षीय फिर्यादी / पीडित व आरोपी नामे – मोहम्मद अब्दुल माजीद फारुक अहमद , रा . आंबेडकर मार्केट जवळ दिग्रस यवतमाळ याच्या कंपणीने स्टॉफसाठी व त्यांचे येण्या – जाण्या साठी आटो रिक्षाची व्यवस्था केली असल्याने फिर्यादी व आरोपी तसेच सहकारी स्टॉफ नमुद ऑटो रिक्षा ने जात येत होते . त्यादरम्यान आरोपीने फिर्यादीशी इतरांपेक्षा जास्त बोलुन जवळीक करण्याचा प्रयत्न केला . तसेच ज्या ज्या वेळी फिर्यादी व आरोपी हे कंपनीत ऑटो रिक्षाने जात असतांना आरोपीने फिर्यादीशी अधिक लगट करुन ‘ तु चष्मा घालू नको छान दिसत नाही तसेच ‘ डोक्यावर ओढणी घे छान दिसत आहे . असे म्हणुन तसेच फिर्यादी यांना त्याचे राहते रुम वरील टेरीस वर एकटक पाहून व राहत असलेलया रुमवर काहीतरी कारण सांगून त्या ठिकाणी जावून फिर्यादी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले . तसेच कंपनी मध्ये कामावर असतांना कामानिमीत्य त्यांच्याजवळ जावुन त्यांच्याशी लग करण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी यांचे लग्न जमल्यानंतर त्याने त्याचे व्हॉटस अप स्टेटस ला धमकीवजा स्टेटस ठेवले या बाबत फिर्यादीने कंपनी कडे तक्रार केली आहे . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे0 आरोपीविरुध्द कलम 354 , 354 ड , 506 भादंवी . कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी नागवे मो.न. 9823403565 हे करीत आहे .