*चिरव्हा येथे आमदंगली चे शुभारंभ*
मौदा प्रतिनिधि – राजू मदनकर
*आमदार सुनील केदार यांच्या हस्ते खासदार कु्पाल तुमाने,कामठीचे नवनिर्वाचीत आमदार टेकचंद सावरकर व मान्यवरांची उपस्थीती*
*दिवाळीचा सण म्हटले की ग्रामीण भागात मनोरंजनात्मक आयोजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात यात मंडई,शाहिर सम्मेलन,दंढार,लोकनु्त्य तसेच कुस्ती व आमदंगलीचे आयोजन प्रामुख्याने केले जातात यावर्षी ही मौदा तालुक्यातील चिरव्हा येथे भव्य आमदंगलीचे आयोजन करण्यात आले*
*दि.२/११/२०१९ ला चिरव्हा येथे आमदंगल उद्घाटक प्रसंगी लाभलेले मा.श्री.आमदार सुनिलबाबू केदार,यावेळी उपस्थिती मा.खासदार कृपालजी तुमाने,सुरेशभाऊ भोयर मा.अध्यक्ष जि.प.नागपूर,तापेश्वर वैघ मा.उपाध्यक्ष जि.प.नागपूर,टेकचंद सावरकर आमदार कामठी-मौदा,ज्ञानेश्वर वानखेडे अध्यक्ष काँग्रेस कमेटी मौदा तालुका,राजेश ठवकर उपसभापती मौदा,राजेंद्र लांडे माजी सरपंच बोरगांव,दिगांबर ठोंबरे माजी सरपंच चिरव्हा, चांगोजी तिजारे माजी सरपंच देविदास राजगिरे पो.पाटील चिरव्हा,हेमराज ठोंबरे,अध्यक्ष तंटामुक्ती पितांबर राजगिरे मा.अध्यक्ष तंटामुक्ती,छत्रपाल बान्ते माजीउपसरपंच,रोशन ठोंबरे उपसरपंच दिलीप राजगिरे अध्यक्ष आमदंगलसमिती परमेश्वर कातोरे उपाध्यक्ष समिती,शिवराज माथुरकर नगरसेवक मौदा,बंटी हटवार भाऊराव ठवकर,निलकंठ चरडे,मोहन ठोंबरे,वामन निंबार्ते,राजु गोमकर,अमोलभाऊ राजगिरे, योगेश सांडेल,विनोदभाऊ राजगिरे,प्रशांत तिजारे,नरेश राजगिरे,महादेव बान्ते,रवि कडव,पांडूरंग तिजारे व अन्य गावकरी उपस्थित.*
*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत आमदार सुनील केदार यांनी म्हटले की आपला भारत देश हा विविधतेनी नटलेला देश असुन या देआची आत्मा म्हणजे ग्रामीण भाग आणी आजच्या या धकाधकीच्या जिवनात आपले आरोग्य टिकवून ठेवण्याकरिता असे जमीनी खेळ अंत्यंत महत्वपूर्ण ठरतात आजही अनेक ग्रामीण खेळाडू अंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव लौकीक करत आहेत.ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती अंत्यंत जोमाची असुन सुध्दा सर्व ग्रामस्थ व आयोजक मंडळी आपले सर्व सुखःदुखः बाजुला सारुन एकत्र येऊण असे भव्य आयोजन करतात ते खरेच अभिनंदनाचे पात्र आहे.या दंगली मधे विजयी होणारे पहलवानांना हार्दिक शुभेच्छा देत पराभूत झालेल्यांनी आपल्या पराभवला खचुन न जाता आपला पराभव का झाला यावर अभ्यास करुन पुढच्या लढतीच्या तयारीस लागावे असा मोलाचा सल्ला देऊण सर्व स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले*