*बोलोरो वाहनाच्या धडकेत अँक्टीव्हा चालकाचा मुत्यु मागे स्वार महिला गंभीर जख्मी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारात मनसर कडुन नागपुर कडे जाणार्या अँक्टीव्हा दुचाकीला अज्ञात बोलोरो वाहनाने जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक थोक फळ विक्रेता संदीप काकपुरे याचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर मागे स्वार महिला गंभीर जख्मी झाल्या ने उपचारार्थ दाखल करण्यात आले.
गुरूवार दिनांक.१४ ऑक्टोंबर ला दुपारी ४ वाजता च्या दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारातील अमित पोल्ट्री फार्म समोर मनसर कडुन नागपुर कडे जाणार्या अँक्टीव्हा क्रमांक. एम एच ४९ बी जे ४४२७ दुचाकीला अज्ञात बोलोरो वाहनाने जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक संदीप विजयकुमार काकपुरे वय ४० वर्ष राहणार. आर्शिवाद नगर नागपुर हा बेर बाजार महात्मा फुले मॉर्केट नागपुर येथे थोक फळ विक्रेता असुन याचा घटना स्थळीच मुत्यु झाला तर मागे स्वार फळ विक्री कामात मदत करणारी महिला रिया भारत मसाने वय ३० वर्ष राहणार. पिंडकापार कळमेश्वर ही गंभीर जख्मी झाल्याने नागरिकांनी जे एन दवाखाना कांद्री येथे प्राथमिक उपचारार्थ दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत असल्याने मेडीकल नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी विलास महादेवराव डगवार वय ४९ वर्ष राहणार. बिळीपेठ नागपुर यांचे तोंडी रिर्पोट वरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक अमितकुमार आत्राम पुढील तपास करित आहे.