*मानवतेला काळिमा फासणारी घटना*
*1 ते 2 दिवसाच्या अनोळखी जन्मजात लहान बाळास बेवारस सोडुन आईवडील झाले पसार*
*देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील निमटोला येथील धक्कादायक प्रकार*
रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी सह विक्रम श्रीरामे
रामटेक – पोलीस स्टेशन देवलापार हद्दीत दि.20/10/2021 रोजी रात्री 11.00 वाजता दरम्यान मौजा निमटोला येथील ग.भा. सुनीता हंसराज कुमरे वय 40 वर्ष रा.निमटोला ता.रामटेक या आपल्या शेतात मुलीसह शेतातील पिकाच्या राखणीकरिता गेलेली असता तिच्या शेतात गवतापासून तयार केलेल्या झोपडीमध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.इतक्या रात्री लहान बाळाचा आवाज येत असल्याने त्यांनी झोपडीत जाऊन पाहिले असता तेथील मचाणावर एक अनोळखी जन्मजात लहान बाळ (मुलगी) अंदाजे वय 1 ते 2 दिवस दिसून आले.त्यांनी आजूबाजूला बाळाच्या आईवडिलांचा शोध घेतला परंतु कोणीही दिसून न आल्याने तिला काहीतरी विचित्र घटना घडल्याचे भास झाले.आपल्या शेतात एका जन्मजात बाळ अशा अवस्थेत आढळून आल्याने सुनीता कुमरे ही पूर्णपणे घाबरून गेली.सदर घटनेची माहिती त्यांनी गावात दिली.ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस स्टेशन देवलापार यांना माहिती देण्यात आली.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी पाठवला व घटनास्थळावरून सदर अनोळखी जन्मजात बाळाला ताब्यात घेतले.पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळाच्या आईवडिलांचे व नातेवाईकांचे शोध घेतले असता शोध न लागल्याने बाळास महिला पोलीस कर्मचारी स्नेहा डोंगरे यांच्या हस्ते सुखरूपपणे बाळाची देखभाल करण्यासाठी मेडिकल हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल केले आहे.अशा प्रकारचे मानवजातीस न शोभणारे कृत्य करणारे -वडिलांवर फिर्यादी नामे ग.भा. सुनीता हंसराज कुमरे वय 40 वर्ष रा.निमटोला यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन देवलापार येथे अपराध क्र.167/21 कलम 317 भा.द.वी.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत.