*दुचाकी ची रस्ता बाजुच्या दुभाजक कठडयास धडक लागुन चालकांचा मुत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन पासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन लॉन सामोरील रस्ता च्या बाजुच्या सिमेंट डिवाईडर व कठडयाला रामटेक वरून कांद्री घरी परत येणाऱ्या शुशिल यादव यांचे दुचाकीचे संतुलन बिघडुन दुभाजकाला जोरदार धडक लागुन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त स्त्राव झाल्याने डॉक्टरानी मृत घोषित केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक.२१ ऑक्टोंबर २०२१ ला सकाळी १० वाजता सुनिल सत्यनारायण यादव वय २५ वर्ष राहणार. बोरडा रोड हिंदुस्तान काॅलोनी वार्ड क्रमांक ५ कांद्री यांच्या मोठा भाऊ मृतक शुशील सत्य नारायण यादव वय २७ वर्ष राहणार. बोरडा रोड हिंदुस्तान काॅलोनी वार्ड क्रमांक ५ कांद्री हा रामटेक ला आपल्या मोटार सायकल क्रमांक एम एच ४० बी.एम २५१९ हिरो होंडा कंपनीची एच एफ डिलेक्स काळया आणि लाल रंगाच्या दुचाकीने एकटाच लाकुड कापायला जात आहे असे सांगुन घरुन निघाला आणि मृतक याने सायंकाळी ६ वाजता आपल्या लहान भाऊ सुनिल यादवला फोन करून सांगितले कि मी मनसर ला आहे तु रस्सा घेऊन ये वाहना मधुन लाकुड उतरवा यचे आहे. असे सांगितल्याने सुनिल हा मनसर ला गेला व तेथुन रामटेक ला गेला तिथे त्याचा मोठा भाऊ होता. त्यानंतर रामटेक मध्ये वाहन खाली करून दोघे ही भाऊ हे आप आपल्या दुचाकी वाहनाने घरी कांद्री कडे निघाले. सुनिल हा घरी पोहचला परंतु शुशिल मनसर ला थांबुन उशिरा रात्री घरी परत येत असतांना दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीने चालविल्याने वाहनावरील संतुलन बिघडुन नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन लॉन सामोरील रस्ता च्या बाजु च्या सिमेंट डिवाईडर व कठडयाला जोरदार धडक लागुन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त स्त्राव झाल्याने महामार्ग पोलीसांनी कामठी उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. फिर्यादी सुनिल ला रात्री २ वाजता दरम्यान फोन करून सांगितले. कन्हान पोलीसानी फिर्यादी यांच्या लहान भाऊ सुनिल यादव यांचे तक्रारीवरून अपराध क्रमांक ३९२/२०२१ कलम २७९ , ३०४ (अ) भांदवी सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम हे करीत आहे.