*कामठी तालुक्यातील महिला बचत गटांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध*

*कामठी तालुक्यातील महिला बचत गटांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा मंत्री श्री अतुल जी ठाकरे यांच्यामार्फत तसेच पुष्पराज मेश्राम जिल्हा प्रभारी शिक्षक आघाडी, जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती आघाडी द्वारे तालुक्यातील महिला बचत गटांना Product Packing च्या कामाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.


गुरुवार दिनांक 21आॅक्टोंबर 2021 रोजी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा मंत्री श्री अतुल ठाकरे यांच्या मार्फत तसेच पुष्पराज मेश्राम जिल्हा प्रभारी शिक्षक आघाडी, जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती आघाडी द्वारे ग्रामपंचायत आजनी, तालुका कामठी येथील क्रांतिज्योती महिला बचत गट, नरेंद्र कृपा महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट, मातोश्री महिला बचत गट, किरण महिला बचत गट, उन्नती महिला बचत गट, निर्मल महिला बचत गट, सनवी महिला बचत गट,सावित्रीबाई फुले महिला बचत गट, तुळजाभवानी महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, श्री साई महिला बचत गट, गजानन महिला बचत गट, उत्कर्ष महिला बचत गट,एकता महिला बचत गट या महिला बचत गटांना हिरकणी व्यवसाय महिला उद्योग समूह या संस्थेद्वारे महिलांना Product Packing चे काम देण्यात आले व त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी Product Packing च्या कामाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …