*जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार विरोधी दक्षतेची शपथ*

*जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार विरोधी दक्षतेची शपथ*

नागपूर  : देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथडा आहे. यासाठी शासन, नागरिक व खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकांनी दक्ष राहून सदैव प्रामाणिकपणा सचोटी यांच्या उच्चतंम मानकाप्रती वचनबध्द असायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या वेळी केले.


प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सच्चेपणा आणि कायद्याचे पालन, लाच घेणे-देणे गुन्हा आहे, प्रामाणिकपणे व पारदर्शक पध्दतीने जनहितासाठी कार्य करणे, वागणूकीत सचोटी, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देण्याविषयी शपथ देण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार राहूल सारंग, आधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …