*युवकावर नोंदवीलेल्या खोट्या प्रकरणाची योग्य चौकशी करूण न्याय द्या अन्यथा गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा*

*युवकावर नोंदवीलेल्या खोट्या प्रकरणाची योग्य चौकशी करूण न्याय द्या अन्यथा गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील बडेगाव मार्गावर अवैध रेती परिवहणाधर आळा घालण्यास कर्तल्यावर उभे असलेल्या दोन तलाठी यांनी खापा व्यवसाई अनुप खंते वर खापा पोलीसात नोंदवीण्यात आलेला गुन्हा परत घेण्याकरिता खापावासीयांचे निवेदन.

*प्राप्त माहितीनुसार खापा येथील युवक अनुप भोजराज खंते हा डीजे,जनरेटर व लायटिंग इत्यादीचा व्यवसायी असुन दि 27 आक्टोंबर रोजी सायंकाळी 10-00 चे दरम्यान आपल्या व्यवसायावरून बडेगाव वरुन परत खाप्याला आपल्या घरी परत येत असतांना खापा पारशिवनी रोडवरील बडेगाव टी पाँइंट च्या आधी काही अंतरावर सावनेर तहसील राजस्व विभागाचे दोन तलाठी दिसले असता त्यांनी त्यांना इंथे का उभे असा जाब विचरला असता त्यांच्यात शब्दीक वाद निर्माण होऊण अनुपशी वाद घालत शिवीगाळ करत लांबाझोबी करू लागले असता सदर सानसुन ठीकाणी इतर कुणाचाही घातपात होऊ नये म्हणून त्यानी जवळच असलेल्या वन विभागाची चौकी तसेच बार च्या दिशेने मोठ्याचे आवाज देताच परत दोघांनी त्याचे तोंड कोंबून जबर मारहाण केली व त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकी वाहनाने पळून जात सतांना युवकास आम्ही पटवारी आहो पटवारी थांब साल्या तुला आमचा पावर दाखवतो व आता पाह तुझा कसा गेम करतो अशी धमकी देत नीघून गेले असा आरोप उपस्थित नागरिकांनी करत अनुपवर नोंदविण्यात आलेला गुन्हा परत घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*

*संतप्त शहरवासीयांनी खापा पोलीस स्टेशन गाठून युवक अनुप खंते यांच्या विरोधात खोटी तक्रार नोंदवली असल्याची माहिती पुढे येत आहे.सदर घटनेचा खापा शहरवासीयांकडून तिव्र निषेध नोंदवला जात असुन खापा पोलीसांच्याही कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला जात आहे*

*तर दोन्हीही शासकीय कर्मचारी अवैधरीत्या होणाऱ्या रेती परिवहणावर आळा घालण्याच्या उद्देशाने आपल्या कर्तव्यावर असल्याची माहीती असुन यातुनच सदर प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे.*

*सदर घटनेबाबत तहसील कार्यालय सावनेर चे कर्मचारी यांनी दीलेल्या प्राथमिक माहिती नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आला असुन तपासाअंती सत्यता पुढे येईलच व त्यानुसारच योग्य कारवाई करण्याची माहीती खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दीली*

*कुणावरही अन्याय होऊ देणार नाही – अशोक सरंबळकर*

*खापा पोलीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने सावनेर पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर यांच्याशी संवाद साधला असता संतप्त नागरिकांना आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य चौकशी करण्याचे तसेच कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासीत करुण शिष्टमंडळाची समजुत घातली*

*तर नोंदवीलेल्या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करुण दाखल करण्यात आलेला गुन्हा परत घेण्याच्या मागणीचे निवेदन खापा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना देण्यात आले असुन मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*

*घडलेल्या या प्रकारावर सावनेर तहसीलचे तहसीलदार प्रताप वानखेडे यांच्याशी आमचे स्थानिक प्रतिनिधींनी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही*

*याप्रसंगी नगर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुरेश चंद्रवौशी,नगर काँग्रेस कमेटी सचिव योगेश्वर गोखे,खापा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मु्णाल हरडे,खेमराज बारापात्रे,भोजराज खंते सह खापा शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती,व्यवसायीक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …