*कन्हान शिवनगर येथुन भरदिवसा दुचाकी वाहन चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*कन्हान शिवनगर येथुन भरदिवसा दुचाकी वाहन चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि -ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एक किलो मीटर अंतरावर असलेल्या शिवनगर कन्हान येथुन घरासमोर ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी अमिर मुकेश घोडेस्वार हा आंबिलडुके शिव नगर कन्हान यांच्या घरी किरायाने राहत असुन तो बुधवार दिनांक २७ आॅक्टोंबर ला दुपारी १:३० वाजता च्या सुमारास आपले काम करून घरी आला असता त्यानी आपली दुचाकी वाहन घराच्या गेट समोर उभी करून आत मध्ये गेला व दुपारी ३:०० ते ३.३० वाजता च्या सुमारास घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांची दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० ए पी ०८८९ मोटार सायकल हिरो स्मार्ट स्पेंलडर किमत अंदाजे २०.०००रूपये न दिसल्याने परिसरात शोध घेतले असता मिळुन आले नाही . अश्या फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४००/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …