*महाराष्ट्र शासनाच्या “मिशन वात्सल्य”योजने अंतर्गत राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास,पशुसंवर्धन,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारांच्या प्रमुख उपस्थितीत “संवेदनेची दिवाळी” साजरी*

*महाराष्ट्र शासनाच्या “मिशन वात्सल्य”योजने अंतर्गत राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास,पशुसंवर्धन,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारांच्या प्रमुख उपस्थितीत “संवेदनेची दिवाळी” साजरी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः सावनेर तहसील महसूल विभाग,ग्रामविकास,कु्षी विभाग तसेच संपूर्ण तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना काळात निराधार झालेल्या कुटुंबीयांना संवेदनेचा आधार मीळावा तसेच त्यांना दिवाळी व भाऊबीजेच्या निमित्ताने शासन व प्रशासन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे या उद्देशाने शासनाच्या “मिशन वात्सल्य” योजने अंतर्गत क्षेत्राचे नेते व राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील निराश्रित झालेल्या भगिनींना भाऊबीजेची भेट म्हणून साडी चोळी तसेच तेल,साखर,सर्व प्रकारच्या डाळी व कुटुंबउपयोगी वस्तू सोबतच,पंचायत समिती सावनेर च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,कुपोषित परिवारांना सकस आहार,कु्षी विभागातर्फे बी बीयाने,शेतीविषयक आधुनिक यंत्रे व टँक्टर ,शिधापत्रिका व शेतीचे सातबारा आदिंचे वाटप मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले*

*सदर आयोजनाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मंत्री सुनील तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार प्रताप वाघमारे,नागपुर जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,पंचायत समिती सावनेर चे बीडीओ दिपक गरुड,तसेच पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी,गोविंदा ठाकरे,माजी नगर उपाध्यक्ष गोपाल घटे प्रामुख्याने उपस्थित होते.


*सदर आयोजनात तालुक्यातील कोरोना काळात निराश्रित झालेल्या 118 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला सदर आयोजनाचे प्रास्ताविक करत तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी म्हटले की “मिशन वात्सल्य”योजनेच्या आयोजनासोबतच मंत्री साहेबांनी कोरोना निराश्रित भगिनींना साडी चोळी,व मुलांना शैक्षणिक वस्तूचे नियोजन करण्याच्या सुचनेवरून तालुक्यातील आम्ही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या निराश्रितांच्या भावना जपन्या करीता आम्हीही आपल्या परिवारा दिवाळी साधेपणाने साजरी करू असा संकल्प घेत दिवाळीच्या फटाक्यांवर होणारा खर्च गोळा करुण त्यातुनच या कुटुंबीयांना सदर भेट वस्तू पुरविण्याचा सुप्त उपक्रम राबविण्यात आल्याची माहीती दीली*

*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की राज्य सरकार नेहमीच दिन दुबळ्यांच्या उत्थानासाठी तसेच कोरोना महामारीत निराश्रितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,देशाच्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकांच्या मुलभूत गरजेची पुर्तता करणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे तर या सर्व यंत्रणा यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी प्रशासन चांगल्या प्रकारे पार पाडत आहे आजच्या या आयोजनाच्या यशस्वीतेकरिता तहसील प्रताप वाघमारे ,बिडीओ दिपक गरूड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या आयोजनाची प्रचीती व अनुलोकन समस्त महाराष्ट्र करेल असा विश्वास व्यक्त करत आयोजनात उपस्थित भगिनीं,लाभार्थी व मान्यवरांना ,दिवाळी ल भाऊबीजेच्या शुभेच्छा दिला.*

*आयोजनाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर संचालन व आभार खंडविकास अधिकारी दिपक गरुड यांनी केले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,शिक्षण विभाग,कु्षी विभाग,तालुका आरोग्य विभाग आदिंच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …