*जियो टाॅवर वरील पॅरोसोनिक कंपनीच्या दोन बॅटऱ्या चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , पुढील तपास सुरू*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत १० किलो मीटर अंतरावर असलेल्या डुमरी शिवार येथुन जियो कंपनी च्या टाॅवर वरील ओडीसी मधील पॅनोसोनिक कंपनीच्या दोन बॅटऱ्या दिनांक २५ आॅक्टोंबर २०२१ ला सायंकाळी ६:०० वाजता ते दिनांक २९ आॅक्टोंबर २०२१ ला रात्री १:४५ वाजता च्या सुमारास
कोणीतरी अज्ञात आरोपी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २५ आॅक्टोंबर ला सायंकाळी ६:०० वाजता च्या सुमारास फिर्यादी जोगेंद्र साहेबप्रसाद गुप्ता वय ४५ वर्ष राहणार जय दुर्गा कांन्द्री कन्हान यांना रिलायंस जिओ आॅफिस ओमसीआर हिंगणा नागपुर येथुन आले कि डुमरी येथे जियो टाॅवर चे डाऊन झाले आहे .
अशा मिळालेल्या माहिती वरुन फिर्यादी जोगेंद्र साहेबप्रसाद गुप्ता यांनी रात्री ०८:०० वाजता डुमरी चंपा आश्रम च्या बाजुला असलेल्या जियो कंपनीचे टाॅवर येथे जाऊन पाहणी केली आणि तेथील डाऊन झालेले सिस्टम सुरु केले तेव्हा जियो टाॅवर ला असलेल्या पॅनोसोनिक कंपनीच्या तीन बॅटऱ्या सिस्टमला लागले असल्यामुळे फिर्यादी जोगेंद्र साहेबप्रसाद गुप्ता तेथील काम आटपुन रात्री ०८:३० वाजता निघुन गेले . गुरुवार दिनांक २८ आॅक्टोंबर ला फिर्यादी जोगेंद्र साहेबप्रसाद गुप्ता ड्युटी वर असतांना रात्री ११:३० वाजता च्या सुमारास सुपरवाइजर प्रणय पडोळे यांचे फोन आले व त्यांनी फिर्यादी ला सांगितले कि डुमरी येथील जियो टाॅवर वरील लो बॅटरी असल्याचे फोन वर सांगितल्याने फिर्यादी यांनी शुक्रवार दिनांक २९ आॅक्टोंबर ला पहाटे रात्री ०१:४५ वाजता च्या सुमारास डुमरी येथील जियो टाॅवर चे ओडीसी चेक केले असता त्यात पॅनोसोनिक लिथीयम कंपनीच्या ५६ ए एच ४८ वोल्ट च्या तीन बॅटऱ्या पैकी दोन बॅटऱ्या किंमत ८९.२३३ रुपए चे दिसुन न आल्याने फिर्यादी यांनी लगेच सुपरवाइजर प्रणय पडोळे व इंजिनियर निलेश यांना घटने बाबत माहिती दिली . अश्या फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४०४/२१ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे .