*जागेच्या वादातुन धक्काबुक्की , उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यु*
*नागरिकांचे पोलीस स्टेशन ला घेराव , तनावाचे वातावरण*
*आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करा – नाभिक एकता मंच*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत बारईपुरा येथे झालेल्या जागेच्या वाद विवादा मध्ये दोन गुटात धक्काबुक्की झाल्याने एका महिलेला गंभीर दुखापत झाली असता तिची हालत चिंताजनक असल्याने तिला नागपुर मेडिकल रुग्णालय येथे उपचारा करिता नेले असता शनिवार ला उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यु झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी व नाभिक समाजाचा बांधवांनी कुटुंबीयांना न्याय देण्याचा मागणी करिता पोलीस स्टेशन चा घेराव करीत आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
पोलीस सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ९:०० वाजता च्या सुमारास भाऊराव फुलबांदे व गजानन डायरे यांच्यात जागेवरुन वाद झाला होता .या वाद विवादा मध्ये भाऊराव फुलबांधे यांच्या पत्नी आशा फुलबांधे सुद्वा हजर होत्या . या दरम्यान वादांचे रुपांतर धक्काबुक्की झाले असता गजानन डायरे यांनी भाऊराव फुलबांधे यांच्या पत्नी आशा फुलबांधे ला ढकलले असता ती जमीनीवर कोसळुन बेशुद्ध झाली असता पती भाऊराव फुलबांधे यांनी आपल्या पत्नी आशा फुलबांधे ला प्रथम पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथे प्रथमोउपचार देत आशा फुलबांधे ला नागपुर मेडिकल रुग्णालय येथे उपचारा करिता नेण्यात आले होते . या दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२:३० वाजता च्या सुमारास भाऊराव फुलबांधे यांच्या पत्नी आशा फुलबांधे यांच्या उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने संपातलेल्या शैकडो नागरिकांनी व नाभिक समाजाचा बांधवांनी शनिवारी दुपारी ११:०० वाजता च्या सुमारास आशा फुलबांधे यांच्या मृतदेहासह पारशिवनी पोलीस स्टेशन चा घेराव करीत आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी धरली असता जो पर्यंत आरोपीला अटक व फुलबांधे परिवाराला न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह हटविणार नाही अशी भुमिका संतापलेल्या नागरिकांनी घेतली असता कन्हान चे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी न्याय मिळवुन देण्याचे आश्वासित करीत नागरिकांना शांत केल्यानंतर महिलेचा मृत्युदेह शवविच्छेदना करिता पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता पारशिवनी पोलीसांनी आरोपी गजानन डायरे याला त्याचे राहत्या घरुन अटक केली . पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव सह आदि पोलीस कर्मचारी करीत आहे .
समाजावर अन्याय सहन करणार नाही – नाभिक एकता मंच
पारशिवनी शहरात घडलेल्या प्रकरणाचा निषेधार्थ नाभिक एकता मंच च्या पदाधिकार्यांनी
पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव यांची भेट घेतली असता या प्रकरणा बाबत चर्चा करुन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी नाभिक एकता मंचाचे माजी जिल्हा अध्यक्ष शरद वाटकर , तालुका अध्यक्ष सुनिल लक्षणे , जिल्हा उपाध्यक्ष शेषराज येऊतकर , देविदास चौधरी , तालुका सहसचिव रूपेश बोरकर , कामठी तालुका अध्यक्ष अभिषेक फुलबांधे , देविदास चौधरी , संजय फुलबांधे , प्रशांत लक्षणे, खंडाळा अध्यक्ष समाजसेवक नीलकंठ ऊनपाने सह आदि नाभिक समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते .
सुरक्षेतेची हमी द्यावी – नाभिक एकता मंच
समाज संघटनांनी वेळोवेळी समाज सुरक्षेची मागणी प्रसाशाना समोर ठेवून सुद्धा प्रसाशन नाभिक समाजाच्या अन्याय व सुरक्षे विषयी उदासीन दिसत या हत्याकांडात एक आरोपी फरार असुन पोलीसांनी ताब्यात घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी व नाभिक समाजाच्या सुरक्षेतेची हमी दयावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला असुन येत्या गुरुवारी समस्त समाज बांधव द्वारे निवेदन सादर करण्यात येणार आहे . अशी माहिती माजी जिल्हा अध्यक्ष नाभिक एकता मंच चे शरद वाटकर यांनी दिली आहे .