*बीग ब्रेकींग*
*गोंदिया पोलिसांना मिळाला नक्षल्यांचा मोठा विस्फोटक साठा*
*गोंदिया पोलिसांनी उधडला नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव*
*सालेकसा पोलिस स्टेशन हद्दीतील गडमाता पहाडी बेवारटोला डॅम दरेकसा जंगलात नक्षल्यांनी पेरून ठेवले होते वीस्फोटके*
विशेष प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया – जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने नक्षलग्रस्त असलेल्या पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत येत असलेल्या गडमाता पहाडी-बेवारटोला डॅम जंगलात नक्षल्यांनी पोलिसांना मारण्याच्या हेतूने पुरून ठेवलेल्या स्पोटक साहित्याचा शोध लावून साठा हस्तगत केला आहे. सी 60 जवानांचे पथक गोंदिया आणि सी 60 पथक सालेकसा,बी.डी.डी.सी पथक आणि श्वानपथकाच्या माध्यमातून गडमाता पहाडी-बेवारटोला डॅम दरेकसा जंगल परिसरात स्पोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने शोध मोहीम सुरु केली असता 11 इलेक्टरिक डेटोनेटर, 8 जलिटीन रॉड, 2 गावठी बंदूक , 80 फूट वायर , बंदुकीच्या गोळ्या सह अन्य विस्पोटक साहित्य बी. डी. डी सी. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले.*
*गोंदिया पोलीसांची ही मोठी कारवाई असुन नक्षलवाद्यांनी घातपातीकरिता जमिनीत पुरुन ठेवलेली अस्त्र शस्त्रे ताब्यात घेतली असुन पुढील तपास सुरु केला आहे.*