*कोल्हापुरी बंधाऱ्यांचा दरवाजे कधी लागणार ?*
*शेतकरी याची लघुपाटबंधारे विभागकडे मागणी*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
मोवाड – वर्धा नदीवर असलेले दोन कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट पावसाळा संपूर्ण सुध्दा लावण्यात आले नाही. मोवाड कोल्हापूरी बंधारे आहेत. हा एकुन ११ गेटचा आहेत.३३९.५७ लाख रुपये खर्च करून शासनाने हा बांधारा बांधला पण शेतकरी यांना यांच्या फायदा हा पटबंधारे विभागाचे आधिकारी एक महीने पासून शेतकऱ्यांना आज लावतो उद्या लावतो अशा भुलथा देत आहेत. सबंधी आधिकारी यांना फोन केला असता ते फोन ऊचलत नाही. बंधाऱ्याच्या भरोश्यावर या भागातील शेतकऱ्याचे पाण्याचे प्रश्न अवलंबून असते. या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिक असल्याने वर्धा नदीच्या भरोश्यावर शेतकऱ्याचे जिवन अवलंबून असतो.
मोवाड गावाचा पाणीपुरवठा वर्धा नदीच्या भरवस्यावर अवलंबून आहे. या वर्षी पावसाळा समाधान कारक झाला असून सुध्दा संत्रा पिकाला व रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते त्यामुळे ओलती साठी पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असते.
लघु सिंचन व पटबंधारे विभागाने तत्काळ लक्ष देऊन मोवाड येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट तत्काळ लावण्याची मागणी शेतकरी करत आहे. दरवर्षी जेव्हा नदीला कोरड येते अश्या वेळी बंधाऱ्याचे गेट लावण्यात येते त्यामुळे बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. या भागातील लोकप्रतिनिधी नी लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया ;
दर वर्षी जेव्हा नदीचे पाणी आटते त्या वेळेस बांधाऱ्याचे दार बंद केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा मिळत नाही. जर आता बांधाऱ्याचे दार लावले तर नदीचे पाणी वाहते असल्याने पूर्ण पणे कोल्हापुरी बंधारा भरेल व शेतकऱ्यांना याचा पूर्ण पणे फायदा मिळेल . पाटबंधारे व लघुसिंचन विभागाने तात्काळ बांधाऱ्याचे दार लावले.
अंकुश घावडे
भाजपा युवा मोर्चा मोवाड शहर अध्यक्ष