*नागपूर जिल्ह्यातील सर्व एस.टी.आगार कर्मचारी बेमुदत संपावर*

*नागपूर जिल्ह्यातील सर्व एस.टी.आगार कर्मचारी बेमुदत संपावर*

विशेष प्रतिनिधि

नागपूर – जिल्ह्यातील सर्व एस.टी.आगार कर्मचारी पुन्हा एकदा 7 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यावेळी रामटेक येथे एस.टी.कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आंदोलन तीव्र प्रकारचे दिसून आले.”लढा विलगिकरणाचा” असा विषय ध्यानात धरून सर्व संपावरील कर्मचाऱ्यांनी शासन-प्रशासन यांच्यावर जोरदार नारेबाजी केली.राज्य सरकारने सर्व ST आगारांचे विलगिकरण करावे अशी या बेमुदत संपाचे मुख्य उद्देश असल्याचे समजते.अचानक दिवाळीच्या पर्वावर ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे अनेक प्रवाश्यांची फजिती झाल्याची समजते.

अनेक प्रवासी बस स्थानकावर येऊन परत गेल्याचे चित्र लक्षात आले.चालक-वाहकांनी एक मत करून सकाळपासून शासनाविरोधात बंड पुकारल्याचे लक्षात येते.दिवाळीला फक्त 2000 ते 2500 एवढ्या प्रमाणात बोनस प्राप्त होऊन दिवाळी साजरी करण्यास शासनाने भाग पाडले असे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे.अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळी न मिळणे,वेतनात कपात करून वेतन देणे.अशा आदी सर्व समस्यांचे उघड उपस्तीत कर्मचाऱ्यांनी केले.जोपर्यंत ST कर्मचाऱ्यांच्या या मागण्या पूर्ण होत नाही,तोपर्यंत हा संप सतत सुरू असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने रामटेक येथील सर्व शाळा-महाविद्यालये बंद आहेत.मुलांची शाळा सुरू होईपर्यंत जर बस सेवा सुरू झाली नाही तर याचा परिणाम हे विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहे हे मात्र नक्की.

आपल्या मागण्या पूर्ण होत नाही या कारणामुळे आतापर्यंत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी स्वतःचे जीव दिले.तरीदेखील या सरकारला जाग का येत नाही.?असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला आहे. ST कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाला प्रहार जनशक्ती पक्षाचा समर्थन असल्याचे समजते.रामटेक येथील संपाच्या ठिकाणी नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख रमेश कारामोरे यांनी भेट दिली.ज्या कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण न झाल्याने आत्महत्या केल्यात त्यांच्या फोटोला हार घालून व मौन धारण करण्यात आले.कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला प्रहार पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.यावेळी प्रहारचे रमेश कारामोरे,प्रयास ठवरे,प्रकाश दाडे, जितेंद्र नखाते, किरण हटवार, बबन कुंभरे, विद्या गजाम, विनोद गजबे तसेच आदी सर्व रामटेक आगारातील 273 चालक-वाहक व मेकॅनिक कर्मचारी उपस्तीत होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …