*पेंच नदी एसंबा (घाटरोहना) घाटाची अवैद्य रेती चोरून नेतांना टिप्पर ट्रक पकडला* *उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई , ४ ब्रॉस रेती सह १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*पेंच नदी एसंबा (घाटरोहना) घाटाची अवैद्य रेती चोरून नेतांना टिप्पर ट्रक पकडला*

*उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई , ४ ब्रॉस रेती सह १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच नदीच्या एसंबा (घाटरोहना) रेती घाटातुन रेतीचा उपसा करून अवैद्य रित्या चोरून नेतांना उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती ने दहाचाकी टिप्पर ट्रक मध्ये१० ब्रॉस रेती कोंबुन भरून चोरून नेतांना पकडुन १० लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.


कन्हान कोळसा खाणी परिसरात अवैद्य कोळसा चोरी व पेंच नदीच्या एसंबा (घाटरोहना) घाटातुन मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा करून रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज बुधवार दिनांक.१० नोव्हेंबर २०२१ ला दुपारी ११ ते ११:४५ वाजता कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, पोलीस शिपाई धनराज चौरपगार व चालक पोलीस शिपाई सुरज श्रीनाथ सह पोलीस वाहनाने गोंडेगाव, एसंबा परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमी दाराकडुन अवैध रेती वाहतुक करण्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीसांनी गोंडेगाव डुमरी रोड वर पंचासह हजर असतांना वाहन क्रमांक.एम एच ४० बी एल ३८८८ दहाचाकी टिप्पर ट्रक एसंबा दिशेने येतांना वाहन चालकास थांबवुन चालकाचे नाव विचारले असता नसिम मो. नजिर वय ३० वर्ष राहणार. बुनकर काॅलोनी कामठी सांगितले. पोलीस शिपाई यांनी वाहनाची पाहणी करून विचारफुस केली असता त्याने एसंबा रेती घाटातुन वाळु भरल्याचे व कागदपत्रे, परवाना नसल्याचे आणि टिप्पर ट्रक मालक सुशांत काळे राहणार. कामठी यांचे सांगण्यावरून चोरी केल्याचे सांगितले. सदर वाहनात अवैध रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने टिप्पर ट्रक किंमत १०,००,००० रुपये व ४ ब्रास रेती किंमत १२,००० रुपये असा एकुण १०,१२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी धनराज चौरपगार यांच्या तक्रारीवरून वाहन चालक नसिम मो नजिर व वाहन मालक सुशांत काळे यांच्या विरुद्ध ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासाकरिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे सह आदि पोलीस कर्मचारी करित आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …