*शेतकरी अडते हमाल व छोटे व्यापारी यांच्या हिताचे निर्णय घेऊ – अनिकेत शहाणे नवनिर्वाचित सभापती*

*शेतकरी अडते हमाल व छोटे व्यापारी यांच्या हिताचे निर्णय घेऊ – अनिकेत शहाणे नवनिर्वाचित सभापती*

कामठी – कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती पदग्रहण कार्यक्रम संपन्न. सध्या गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या नोट बंदी मुळे शेतकरी व्यापारी वर्ग व इतर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या वर्गावर आर्थिक संकटाचे सावट आले आहे त्यातून सावरण्यासाठी महाराष्ट्राचे पशु सावर्धन व क्रीडा मंत्री नामदार सुनील केदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हुकुमचंद आमधरे यांच्या मार्गदर्शनात जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे व सहयोगी संचालकाच्या सहयोगामुळे सभापती पदावर नियुक्त झालो माझ्या कार्यकाळात मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकरी कशा परिस्थितीत आपले जीवन व्यतीत करीत असतो याची जाणीव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव व त्यांचे सहयोगी
अडते हमाल व इतर लहान व्यापारी यांना योग्य रोजगार मिळावा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतरत्र व्यावसायिक व मिळकतीच्या हेतू च्या दिशेने काम करण्याचे आपले मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अनिकेत शहाणे यांनी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदग्रहण समारोह प्रसंगी मनोगत व्यक्त केले प्रसंगी उपसभापती कुणाल ईटकेलवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बाजार समितीच्या प्रगतीकरिता सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर कृ उ बा स चे माजी सभापती हुकुमचंद आमधरे जी प सदस्य दिनेश ढोले जी प सदस्य अवंतिका लेकुरवाळे प स सदस्य सुमित रंगारी प स सदस्य आशिष मल्लेवार, दिलीप वंजारी, सोनू कुथे, दिशा चंकपुरे, बाजार समितीचे संचालक सुधीर शहाणे, भाऊराव गौरकार, अमोल खोडके , प्रभाकर हुड , सूर्यभान करडभजने, लंकाबाई वाघ, लता अाखरे, कृष्णा कराडभाजणे ,रामकृष्णा प्रगट ,सचिन घोडमारे , सुनील अग्रवाल, नवलकिशोर डडमल, नानक रा झमताणी, रमेश गोमकर, राजू भालेराव तसेच रत्नदीप रंगारी ज्ञानदेव गावंडे कमलाकर तकित अनुराग भोयर किशोर धांडे रमेश कडू निखिल फलके रमेश देऊळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …