*मोठी बातमी*
*डुमरी नवीन पुलीया जवळ बस ट्रॅव्हल्स व दुचाकी वाहनात भीषण अपघात*
*अपघातात देवलापार पोलीस कर्मचारी यांच्या जागीच मृत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी नवीन पुलीया जवळ बस ट्रॅव्हल्स आणि दुचाकी वाहनात जोरदार टक्कर झाल्याने दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ७:०० ते ९:०० वाजता च्या सुमारास मृतक देवलापार पोलीस स्टेशन कर्मचारी गोपीचंद नामदेवराव कांबळे वय ५१ वर्ष राहणार पांहुंरग नगर हिंगणा रोड,डिगडोह नागपुर हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० इ ४४८० ने नाईट ड्यूटी करुन कन्हान मार्गाने घरी येत होता व नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरुन बस ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी २२ पी २९६५ हे जबलपुर ला जात होती . या दरम्यान डुमरी नवीन पुलीया जवळ दुचाकी वाहन व बस ट्रॅव्हल्स दोघेही आमरा समोर येऊन एकमेकांना टकरावल्याने देवलापार पोलीस स्टेशन चे कर्मचारी गोपीचंद नामदेवराव कांबळे यांच्या डोक्याला ,दोन्ही हाताला,दोन्ही पायाला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यु झाला . डुमरी शिवारात गेल्या काही दिवसान पासुन रोडाचे काम सुरु असुन सुद्धा रोडावर कुठल्याही प्रकारचे नाम फलक लावलेले नसुन सुरक्षा गार्ड कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आलेले नसुन ठेकेदार यांच्या लापरवाही मुळे वारवांर या मार्गावर किती तरी अपघात झाले असुन आता पर्यंत खुप लोकांनी आपला जीव गमवलेला आहे .
या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच नापोशि राहुल रंगारी हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतक पोलीस कर्मचारी गोपीचंद नामदेवराव कांबळे याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे .
सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलीस स्टेशन येथे सरकार तर्फे फिर्यादी नापोशी राहुल रंगारी यांचा तक्रारी वरुन आरोपी ट्रॅव्हल्स बस चालका विरुद्ध अपराध क्रमांक ४३७/२०२१ कलम २७९ , ३०३ (अ) भादवि सह कलम १८४ , १३४ , अ , ब मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात नापोशि राहुल रंगारी हे करीत आहे .