*हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार*

*हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – छत्तीसगढ़ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याने पतीने स्विकार न केल्याने निराधार झालेल्या छतीसगढ राज्यातील राजनांदगाव च्या कुमारीबाई हिने न खचता मुलीला जगविण्या करिता तिथुन निघुन भटकत कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचल्यावर कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पाटील हे सामाजिक कार्यकर्ता रजनिश उर्फ बाळा मेश्राम यांना दिसल्याने त्यांनी हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेशदादा बन्सोड यांचाशी संपर्क करून निराधार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या बाळास आधार देत मानुसकी जोपसली.


रेल्वे स्टेशन कन्हान येथे छतीसगढ राज्यातील दुर्ग जिल्हयात शासकीय रूग्णालयात कुमारीबाई हिने गोळस बाळाला जन्म दिला. परंतु मुलगी झाल्याने तिच्या पतीने स्विकार करण्यास नकार दिल्यानेती न खचता हिंमतीने मी काहीपण करून माझ्या गोळस मुलीला जगविण्याकरिता १५ दिवसाचे बाळ घेऊन कुमारीबाई दुर्ग वरून कसीतरी कन्हान रेल्वे स्टेशनवर पोहचली रात्री ९ वाजता रेल्वे स्टेशन समोर बाळास घेऊन भटकत असतांना कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पाटील यांना दिसल्याने तिची विचारपुस केली असता तिची आप बिती ऐकल्यावर कन्हान पोलीस स्टेशन ला माहीती दिली. स्टाप कमी आणि पहिलेच चार प्रकरणे आहे . पोलीसांनी म्हटल्यावर प्रशांत पाटील यांनी समाजिक कार्यकर्ता रजंनिश उर्फ बाळा मेश्राम यास बोलावुन हकीकत सांगितल्याने या महिला व बाळाची मदत फक्त हितेश दादा बन्सोड करू शकतो. तेव्हा हितेश दादाला फोन करून माहीती दिली असता त्यांनी आपली अँब्युलस घेऊन येण्यास होकार दिला. कन्हान पोलीस स्टेशन चे दोन पोलीसांनी चौकसी करून ती सज्ञान असल्याने काही करण्यास असमर्थता दर्शवली. रात्र झाल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पाटील व अविनाश चौधरी यांनी आपल्या घरून जेवन व चांदर, शाल व गरम कंबल कुमारी बाईस आणुन नगदी २५० रूपये देऊन रेल्वे स्टेशन च्या आत जेवण देऊन तात्पुरती व्यवस्था केली. रात्री ११:०० वजता परत घरून गरम कंबल, मोजे, रूमाल व लहान बाळा करिता स्वेटर आणुन दिले.


हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेश दादा बन्सोड हे रोडवरील निराधार, अनाथ, बेवारस, अपंग लोकांच्या मदती करिता सदैव कार्य करित असुन सावनेर वरून कन्हान ला येतांना रस्त्यात माळेगाव जवळ एका हरिणाचा अपघात झाल्याचे आढळल्याने थांबुन त्याची पाहणी करून वनविभास माहीती देऊन प्राणी रक्षक पथकाच्या कर्मचारी यांना त्या हरिणाला स्वाधिन करून कन्हान ला १२.३० वाजता हितेश दादा बन्सोड यांनी पोहचुन कुमारीबाई व बाळाची विचारपुस करून तिच्या मदतीच्या हाकेने सावनेर ला नेण्याकरिता कन्हान पोलीस स्टेशन ला हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी नोंद करून घेतली. मध्यरात्री १.३० वाजता अँब्युलस मध्ये बसवुन सावनेर ला घेऊन गेले. निराधार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या गोळस मुलीला मदतीचा आधार दिला. या प्रसंगी हितज्योती फाऊडेशन सावनेर चे हितेश दादा बन्सोड सहकारी रजत रूसिया, राजा फुले, उमेश मोरे आणि कन्हान चे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पाटील, रंजनिश उर्फ बाळा मेश्राम, अविनाश चौधरी, देशौन्नती पत्रकार मोतीराम रहाटे , पत्रकार ऋृषभ बावनकर, सोनु मसराम, श्रीकांत पाटील आदीने मानुसकी जोपसत महत्वाची भुमिका पार पाडली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …