*तेली समाजाचा एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा*
*एसटी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य करुण न्याय करण्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः तेली समाज पंच कमेटी सावनेर व्दारे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत राज्य शासनाने त्यांच्या रास्त मागण्या मान्य करुण सणासुदीला खोळंबली राज्यातील परिवहन व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
मागील आठवड्यापासून एसटी बस आगारापुढे सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला तेली समाजाचे शहर अध्यक्ष गोपाल घटे,सचिव जयंत पाटील यांच्या यांच्या नेतृत्वात भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या व्यथा जाणून घेत आंदोलनकर्त्यांच्या एसटी महामंडळास राज्य शासनात विलिणीकरण करुण तसेच त्यांच्या प्रलंबित पगार वाढीच्या प्रश्नासह अन्य मागण्यावर राज्य शासनाने तोडगा काढून मार्गी लावावे अश्या आशेयचे पत्र मा.उद्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रेषित करूण आंदोलनकर्त्यांना न्याय देण्याची मागणी पत्रकातुन करण्यात आली आहे.
याप्रसंगी किशोर कावडकर,संजय खुबाळकर,भगवान रायकवाडे,सोमेश्वर भुसारी,चंद्रशेखर कावडकर,विजय बालपांडे,दिलीप घटे,प्रदिप घटे,राजु घटे सह तेली समाज बांधव मैठ्या संखेने उपस्थित होते.