एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार.
(बिबी येथील घटना/आरोपी अटकेत,बाजारपेठ बंद)
आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे
चंद्रपूर जिल्ह्यातील
आदिवासी कोरपना तालुक्यातील बिबी गाव येथे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे चार, वाजताच्या सुमारास एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.सदर घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून सर्वस्तरातून घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.हकीम हुसेन पठाण यांच्या फिर्यादी वरून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक करून ३७६,३४२,३२३ आयपीसी कलम ८,१० प्रमाणे पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा तपास एपीआय देवकर मॅडम करीत असून आरोपी मुलगा हा रामनगर बिबी येथील रहिवासी असून पीडित मुलीच्या घरशेजारी राहत असल्याची माहिती मिळात आहे.पिडीत मुलीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तर आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सदर घटनेमुळे बिबी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.