*कन्हान व कांद्री येथे महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची थाटात साजरी*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान व कांन्द्री परिसरात आदीवासी समाजाचे महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
आदिवासी सेवा संघ , कन्हान
स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजाना ‘ सळो की पळो ‘ करून सन १८९० च्या कालखंडात भारतात स्वातंत्र्या ची चळवळ ऊभारून क्रांतीचा लढा देणारे क्रांतीकारक महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर ला आंबेडकर चौक कन्हान येथे आदीवासी सेवा संघ व गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान व्दारे विविध कार्यक्रमासह थाटात साजरी करण्यात आली असुन माजी नगरसेविका तिरुमाय राखीताई संदीप परतें यांच्या अध्यक्षेत व गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष तिरु सुखलाल मडावी यांच्या हस्ते महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कन्हान नगरसेवक तिरु राजेश यादव, तिरू राजेंद्र शेंदरे, मनिष भिवगडे, ग्रा प कांद्री सदस्य तिरु राहुल टेकाम, राजेश फुलझेले , खुशाल बन्सोड, ऋृषभ बावनकर, प्रविण गोडे, संजय रंगारी, अखिलेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मुलनिवासी गोंडीयन समुहाने क्रांतीविर बिरसा मुंडा अमर रहे च्या घोषणाने परिसर क्रांतीमय दुमदुमुन सोडला. यावेळी सुखलाल मडावी यांनी महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी केलेल्या क्रांतीच्या इतिहासाची माहिती देत उपस्थित जनसमुहास होणा ऱ्या अन्याय व अत्याचारा विरूध्द लोकशाही मार्गाने लढा देण्याकरिता गोंडवाना समाजातील एकतेचे महत्व पटवुन दिले. त्यानंतर तिरुमाय माजी नगरसेविका राखीताई परतें यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष तिरु सोनु मसराम यांनी केले तर संदीप परतें यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तिरु पंचमजी सलामे, तिरु गगन सिरसाम, तिरु बंडूजी ईरपाते, तिरु खैलेश सलामे, तिरु रवीभाऊ पंधरे, तिरु सुनील टेकाम , तिरु जे डी भलावी, तिरु राजवीर मडावी, तिरु अनिल मरस्कोले, तिरु शंकर मडावी, तिरु सोनु मडावी, तिरु राजेश टेकाम, तिरु सुरज वरखडे, तिरू रजनीश मेश्राम, तिरुमाय रुपलताबाई सलामे, रेखाबाई परतें, माल तीबाई भलावी, सुशिला ईनवाते, केशरबाई सिरसाम, सुभांगी मडावी, पलक मडावी, खुशी जामकर आदि ने सहकार्य केले.
कन्हान शहर विकास मंच
कन्हान शहर विकास मंच द्वारे महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर ला महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुरज वरखडे, महादेव लिल्हारे आदीने बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, महेंद्र साबरे, हरीओम प्रकाश नारायण, हर्ष पाटील , शाहरुख खान, प्रकाश कुर्वे, महेश शेंडे, कामेश्वर शर्मा, अक्षय फुले , महादेव लिल्हारे , चंदन मेश्राम, किरण ठाकुर सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कांद्री ग्रामपंचायत येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी
कांद्री ग्रामपंचायत कार्यालयात महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी श्याम कुमार बर्वे व सरपंच बळवंत पडोळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचा जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमास उपस्थित सर्व सदस्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित व विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कांद्री ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे, राहुल टेकाम, प्रकाश चाफले, बैशाखु जनबंधु , सदस्या दुर्गाबाई सरोदे, वर्षा ताई खडसे, राखी परते, अभय जांबुतकर, गणेश आकरे, ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे सह ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक आनंद नगर कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित चेतन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला व मनीष नंदेश्वर यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, सोनु मसराम व रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित आणि विनम्र अभिवादन करून बिरसा मुंडा यांची जयंती गौरव दिवस म्हणुन थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नितेश मेश्राम, लीलाबाई रंगारी, शैलेश ढोके, सोनु मसराम, रजनीश ऊर्फ बाळा मेश्राम, सागर मानवटकर , निखिल मेश्राम, अमित पाटील, प्रमोद सहारे, नितीन पानतावने, छोटेलाल माणिकपुरी, सूर्यभान वासनिक, सह वंचित बहुजन आघाडी कन्हान च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
भाजपा अनु सुचित जाती मोर्चा कन्हान शहर
भाजपा अनु सुचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन तारसा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भाजपा कन्हान शहर डॉ मनोहर पाठक , व भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , अनुसुचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , सुषमा मस्के , राखी परते , रुषभ बावनकर , अमन घोडेस्वार , सचिन वासनिक , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
नवोदय जनोत्थान कन्हान
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती नवोदय जनोत्थान संघटन द्वारे आंबेडकर चौक कन्हान येथे सर्वप्रथम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदीप बावने, सहसचिव अभिजीत चांदुरकर, अखिलेश मेश्राम, सोनु मसराम सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.