वारसान हक्कासाठी न्यायालयात जाणार.
(परस्पर प्लॉटांची विक्री,भुमाफीयांचा प्रताप/जयंत भोंगळे यांची माहिती)
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे
औद्योगिक शहराच्या गणणेत कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर येथे काही भुमाफीयांनी कमालीचा हैदोस घातला आहे. केवळ शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर प्लॉटांची विक्री करून शासनाच्या तिजोरीला चुना लावला जात असून आगामी काळात आपोआप सीटी सर्व्हेत या प्लॉटांची नोंद नगरपरिषदेत होणार असल्याचे आश्वासन भुमाफिया लोकांना देत असल्याची चर्चा आहे.सध्या गडचांदूर शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बरेच कुटुंब किरायाच्या घरात राहून दिवस काढत आहे.लहान का असेना पण स्वतःच्या मालकी हक्काचा निवारा असावा असे स्वप्न बाळगणारे कित्येक जण जमीनी बद्दल कोणतीही शहानिशा न करता भुमाफीयांच्या भूलथापांना बळी पडून प्लॉट खरेदी करीत आहे.असाच प्रकार नुकताच समोर आला असून येथील सौ.कलाबाई श्रावण भोंगळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन गडचांदूरात आहे.वडीलांच्या मरनोपरांत भावांनी वारसान चढण्यामध्ये यांचे नाव जाणिवपूर्वक वगळले व आपले स्वतःचे नाव टाकून परस्पर विक्री करीत आहे. तसेच उर्वरित जमीन विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे.कुणीही सदर जमीन खरीदी-विक्रीचे व्यवहार करू नये कारण सदर जमीनी बाबत वारसान हक्काच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगत जर कोणी खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असाल तर याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील अशी माहिती जयंत श्रावण भोंगळे या कलाबाईंच्या मुलांनी सर्वास ला मुलाखतीत दिली आहे.एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे शेताचे ईसारपत्र केलेले भुमाफियांनी विक्रीपत्र केल्या शिवाय त्याठिकाणी प्लॉट पाडले आणि स्वतः शेत मालक बनवून खोट्या सह्यांद्वारे सर्रसपणे प्लॉट विक्री करीत असल्याचेही आरोप करण्यात आले असून यासर्व बाबींमुळे आता सदर शेत जमीनीवरील प्लॉट खरेदी करणार्यांपुढे मोठे पेच निर्माण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे यात काही शंका नाही.