अनाधिकृत मद्यसेवा देणाऱ्या हॉटेल्स व धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची संयुक्त मोहीमे मध्ये ३ हॉटेल मालक व १५ मद्यपी वर कारवाई : १२ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त

अनाधिकृत मद्यसेवा देणाऱ्या हॉटेल्स व धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची संयुक्त मोहीमे मध्ये ३ हॉटेल मालक व १५ मद्यपी वर कारवाई : १२ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त

नागपुर
● राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली दरबार, फूड गॅरेज, द जेलर किचन इत्यादी हॉटेल्स व धाब्यावर पोलीस विभागास सोबत घेऊन सार्वजनीक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपिवर व सेवा देणाऱ्यावर कारवाई केली. यामध्ये हॉटेल मालक (१) मुकेश गोविंदराव खवास (२) आशिष मा खडतकर (३) गुलशन घनश्याम दातरे व मद्यपी (१) पराग पुरुषोत्तम पौणिकर (२) पारसराव पवनराव रासकठ्ठा (३) अक्षय मनोज मेश्राम (४) समीर जयसिंग डोंगरे (५) कैलास आर राहुलगडे (६) आकाश अरविंद जैन (७) अजिंक्य गजबिये (८) मणी आर (९) अविनाश कृष्ण चैतन्य (१०) शुभम कोमरेवार (११) पटेल बदरेश (१२) अक्षय इमले (१३) सागर चव्हाण (१४) दिनेश मिस्त्री (१५) संकेत कुकडे इत्यादी वर दारुबंदी कायद्या नुसार गुन्हे नोंदवून वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यपान केलेचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले असून दिनांक १३ रोजी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
● सदरची कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर मा. डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय व पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ निर्मला देवी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशा नुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम मोले, पी एस आय नरहरी फड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अशोक शितोळे, सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक राजेश मोहोड, सागर धिडसे, रविराज सोनूनो, मुकुंद चिटमटवार, दिपील बडवाईक, पूजा रेखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, जवान राहुल पवार, निलेश पांडे, रमेश कांबळे, सुधीर मानकर, महादेव कांगणे, समीर सईद, संजय राठोड, मनोज इंगोले, महिला जवान सोनाली खांडेकर, शीतल सरोदे व जवान नि वाहन चालक राजू काष्टे, रवी निकाळजे, मिलिंद गायकवाड, देवेश पोटे आदींनी भाग घेतला व मोहीम यशस्वी केली.
★ निरीक्षक रावसाहेब कोरे यांची शासकीय सेवा ३३ वर्षे इतकी झाली असून या सेवा काळात उत्कृष्ट कामा बाबत दोन आगाऊ वेतन वाढी, शेकडो प्रमाणपत्र तसेच रुपये सात लाख इतके रोखीने बक्षीस दिले आहे. ★ सद्या कोरे यांचे कडे निरीक्षक ब विभाग तहसील , पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सदर, जरीपटका, गिट्टीखदान, मानकापूर व कपिलनगर या पोलीस स्टेशन अंतर्गतचे कार्यक्षेत्र असून त्यांनी अनाधिकृत हॉटेल्स व धाब्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणले व गेल्या वर्षभरात स्वताचे कार्यक्षेत्र सांभाळून जिल्ह्यातील इतर अधिकारी स्टाफच्या मदतीने ३५० आरोपींना शिक्षा झाल्या *त्यामुळे त्यांना निरीक्षक क विभागाचा* *अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.* आता वरील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रा शिवाय कळमना, कोतवाली, नंदनवन, यशोधरा, अजनी, शक्करधरा, हुडकेश्वर व बेलतरोडी या पोलीस स्टेशन चे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.
★ श्री रावसाहेब कोरे हे पूर्ण वेळ देऊन इतर विभागाना सोबत घेऊन व कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शी व उद्दिष्ट ठेवून काम करणारा अधिकारी आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …