*आदिवासी विकास कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन*

*आदिवासी विकास कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन*

नागपूर : क्रांतीसूर्य आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 146 व्या जयंती निमित्त आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त दशरथ कुळमेथे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गिरीजा उईके, प्रकल्प अधिकारी अशोक वाहणे, सहआयुक्त बबिता गिरी यावेळी उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्यांचे आदिवासी समाजाप्रती योगदानाबाबत संक्षिप्त उजाळा मान्यवरांनी केला. साम्राज्यवादाविरुध्द लढा देणाऱ्या संपूर्ण आदिवासी क्रांतीकारकांच्या कतृत्वाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमांतर्गत विविध मान्यवरांना निमंत्रित करुन आश्रमशाळा व वस्तीगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना व बांधवांना प्रेरित करण्यासाठी संवाद साधण्यात आला. यात बांधकाम व्यवसायी प्रविण कुळमेथे यांनी रंगकला व चित्रनिर्मिती, पुणे सक्सेस व्हिजन ॲकेडमीचे संचालक किरण नैताम यांनी स्पर्धा परीक्षा तर सिनेट सदस्य दिनेश शेराम व सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एम.एम. आत्राम यांनी आदिवासी बांधवाच्या विकासावर मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. गेडाम यांनी आदिवासी रुढी-परंपरा तर इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रा. श्याम कोरेटी व श्री गावराणे यांनीही मत व्यक्त केले.

मान्यवरांना शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोर्णिमा कंगाली यांनी केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …